वेकोलिच्या सीएसआर निधीतून विद्यार्थ्यांना मिळणार शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य

29

माजरी : वेकोलिच्या सीएसआर निधीतून परिसरातील गोरगरीब आर्थिक दुर्बळ विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी मदत करण्याचा अनाेखा उपक्रम ‘तराश योजना’ माजरी परिसरात राबविण्यात येत आहे.

.        या योजनेअंतर्गत कौशल्य शोधाद्वारे सरल तरुणांचे टॅलेंट ॲम्प्लिफिकेशन करणे हे मुख्य उद्देश आहे. दरम्यान तराश योजनेचा उद्देश्यामध्ये प्रवेश परीक्षा जेईई आणि नीट च्या तयारीसाठी प्रशिक्षण, प्रशिक्षण कालावधीसाठी वसतिगृह, इयत्ता अकरावी आणि बारावीसाठी शिक्षण, एक हजार रुपये प्रति विद्यार्थी मासिक स्टायपेंड अशी तरतूद करण्यात आली आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या वंचित हुशार मुलांना संबंधित प्रवेश परीक्षा जेईई आणि नीट-युजी साठी नागपूरमधील नामांकित कोचिंग संस्थांमध्ये प्रशिक्षणाद्वारे देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी आणि वैद्यकीय पदवीपूर्व संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देणे आहे. आणि तराश योजना तरतुदीमध्ये निवडलेल्या ४० विद्यार्थ्यांना यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाईल.

.        या तराश योजनेच्या ४० जागासाठी २ हजार अर्ज प्राप्त झाले असून, या दोन हजार विध्यार्थ्यांची १२ मे रोजी लेखी परीक्षा घेवून त्यांच्यामधून ४० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना पुढील शिक्षणासाठी वेकोलिच्या या योजनेतून आर्थिक साहाय्य देण्यात येईल अशी माहिती वेकोलि प्रशासनाने दिली आहे.