अवकाळी मुसळधार पावसाच्या जिल्ह्यात हाहाकार

39

जनजीवन विस्कळीत   :   वरोरा येथे गारपीट

झाडे कोलमडली       :   अनेक गावाची बत्ती गोल

चंद्रपूर – जिल्ह्यात व शहरात सर्वत्र कडक उन असताना मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास आकाशात अचानक ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि सर्वदूर गारपिटीसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वरोरा तालुक्यात गारांचा पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तसेच शेतीला फटका बसला. उन्हाचा पारा ४४ अंशापार गेला असताना असा अचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिकांना उकाड्या पासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

.        गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात तसेच चंद्रपूर शहरात उन्हाळा चांगलाच तापायला सुरुवात झाली आहे. शनिवारी ४३.८ व रविवारी ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. त्यानंतर सोमवारी पुन्हा उन्हाचा पारा ४३.६ अंश सेल्सिअस होता. मात्र, सोमवारी रात्री उशिरा जिल्ह्यातील काही भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. चंद्रपूर शहरात देखील रात्री उशिरा हलका पाऊस झाला. त्यानंतर मंगळवारी सकाळपासून हळूहळू सूर्य डोक्यावर येऊन ऊन तापायला लागले. दुपारी १ वाजता तर कडक ऊन तापले होते. मात्र २ वाजतापासून अचानक ऋतू बदल झाला आणि आकाशात ढगांचा जोरात गडगडाट सुरू झाला. त्यानंतर अवघ्या काही वेळात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आकाशात सर्वत्र काळे ढग एकवटले होते व पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसामुळे वातावरण थंड झाले असले तरी उकाडा कायम आहे. आकाशात ढगांचा गडगडाट व पावसाच्या रिमझिम धारा सुरूच आहे. पावसामुळे कोरड्या पडलेल्या नाल्या तुडुंब भरून वाहत आहे. रस्त्यावर देखील पाणी साचलेले आहे.

गारपीट व वादळी वाऱ्यासह पाऊस                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                   अचानक झालेल्या गारपीट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. असुन अनेक ठिकाणी मोठ मोठी झाडे उन्मळून खाली पडली. माजरी पाटाळा रस्त्यावर भलमोठ झाड पडल्याने दुपारनंतर वाहतूक बंद झाली होती. तर पाटाळा येथे विजेच्या खांबावर झाड पडले. परिणामी कूचना, नागलोन, पळसगाव, विस्लोन, राळेगाव परिसरात रात्री 9 पर्यंत वीज पुरवठा खंडीत झाला असल्याने पूर्णपणे अंधार पसरला आहे.