*मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा किरमिटी तालुक्यातुन प्रथम तर जिल्हातुन द्वितीय

45

नागभीड : मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानात नागभीड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किरमिटीने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. दि.१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी यांच्यात शाळेविषयी उत्तरदायित्वाची भावना निर्माण होणे, विद्यार्थ्यांना शिकतांना प्रेरणादायी वातावरणाची निर्मिती व्हावी या साठी हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात महाराष्ट्रातील अनेक शाळांनी सहभाग घेतला. नागभिड तालुक्यातील संपुर्ण शाळांनी यात सहभाग घेतला होता. त्यात नागभिड तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा किरमिटीची मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा २०२४ मध्ये नागभिड तालुक्यातुन सर्वश्रेष्ठ शाळा म्हणून प्रथम क्रमांकावर निवड करण्यात आली व त्यानंतर चंद्रपूर जिल्हा स्तरावर उत्कृष्ठ शाळा म्हणून द्वितीय क्रमांकावर निवड करण्यात आली.

.     नुकतीच या शाळेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विवेक जाँन्सन साहेब यांनी भेट दिली असता पळसबागेची प्रशंशा करण्यात आली.या शाळेतील पळसबागेची जिल्हा स्तरावर दखल घेण्यात आली.यात सिंहांचा वाटा शाळेच्या मुख्याध्यापिका भुमिका विनोद नागदेवते मंँडम व शाळेतील संपूर्ण शिक्षकांचा आहे.

.     जिल्हा परिषद शाळा किरमिटीच्या मुख्याध्यापिका भुमिका विनोद नागदेवते यांच्या मार्गदर्शनात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष रामेश्वरी रडके, उपाध्यक्ष ज्योती कामडी, सदस्य सुरज चौधरी, दुधराम मोरांडे, विजय धोंगडे, डॉ.प्रशांत कामडी, मेंढे, धोंगडे कावळे, रामटेके, निरंजना चौधरी, सपना हजारे, मेघा चौधरी, मंगेश दांडेकर, जयश्री मोरांडे, सुनील नन्नावरे, ज्ञानेश्वर नन्नावरे, रसिका लोणारे, अनिता पानसे, सविता चौधरी यांनी सहकार्य केल्याने शाळेने भरारी घेतली आहे. शाळेच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गटविकास अधिकारी पं स नागभीड प्रणाली खोचरे गट शिक्षणाधिकारी पालवे , गट शिक्षण विस्तार अधिकारी सुनिता भंडारी , सरपंच ईश्वरजी लोणारे,केंद्र प्रमुख नान्हे , ग्रामसेवक नंदु मुळणकर, .सरपंच मुरलीधर मोरांडे, . सरपंच रजनी चौधरी, उपसरपंच राजकुमार दडमल, ग्रा.पं.सदस्य सुरज शाळेच्या नेत्रदिपक प्रगतीमध्ये वाटा असणाया नागभीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सदस्यगण, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यगण, गावकरी, पालकवर्ग, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांचे आभार मुख्याध्यापिका भुमिका विनोद नागदेवते यांनी व्यक्त केले.