अज्ञात वाहनांच्या धडकेत मादी चितळ ठार

24

       मोटेगाव नवरगाव मार्गावरील घटना       

नेरी : नेरी नवरगाव मार्गावरील मोटेगाव तलावाच्या वेस्टवेअर लगत शनिवारी सकाळी 6.30 वाजता दरम्यान एका अज्ञात वाहनाने मादी चितळाला धडक दिली या धडकेत चितळ जागीच ठार झाले सदर घटनेची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली असता तात्काळ वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

.        मोटेगाव हा जंगल व्याप्त परिसर असून वनप्राण्याचा अधिवास असलेला जंगल असून अनेक वन्यप्राणी या परिसरात पहावयास मिळतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्राणी पाणी पिण्यासाठी मोटेगाव येथील तलावात येतात त्यामुळे आज सकाळी याच तलावाच्या वेस्टवेअर जवळ मार्गावर अज्ञात वाहनाने चितळाला जोरदार धडक दिली.

.        सदर घटनेची माहिती मिळताच वनरक्षक पाटील, क्षेत्र साहाय्यक अधिकारी रासेकर आणि त्यांची चमू घटनास्थळी दाखल झाली गावातील अनेक नागरिकांनी चितळाला बघण्यासाठी एकच गर्दी केली होती सदर चितळ हे मादी असून अंदाजे चार वर्षे वयाचे असून मोठे आहे चितळाचा पंचनामा करून अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल करून चितळाला सावरगाव येथील वनडेपोत अतिंमसंस्कार करण्यात आले.