तीन गावांचा प्रभार असलेल्या ग्रामसेवकाची त्वरित हकालपट्टी करा

29

नाचणभट्टी, मिनघरी, अंतरगाव येथील नागरिकांची मागणी

सिंदेवाही : पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या नाचनभट्टी येथील ग्रामपंचायत चे ग्रामसेवक संदीप घोनमोडे यांचेकडे मिनघरी, आणि अंतरगाव येथील ग्राम पंचायतीचा अतिरिक्त प्रभार असून ते कोणत्याही ग्राम पंचायती मध्ये वेळेवर कधीच जात नसल्याने नागरिकांचे कामे थांबलेली आहेत. परिणामी विविध योजनेपासून नागरिकांना वंचित राहावे लागत असल्याने ग्रामसेवक संदीप घोनमोडे यांची तिन्ही गावातील प्रभार काढून त्यांची त्वरित हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी नाचनभट्टी सह मिनघरी, तथा अंतरगाव येथील नारिकानी प्रसार मध्यातून केली आहे.

.       ग्रामसेवक संदीप घोणमोडे हे मागील अनेक दिवसापासून नाचनभट्टी येथील ग्राम पंचायत मध्ये कार्यरत आहेत. घोनामोडे यांचे कामकाजाबाबत नागरिकाना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामसेवक घोणमोडे ग्रामपंचायत कार्यालयात कधीच वेळेवर येत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांची सतत गैरसोय होते. जात ग्राम पंचायत मध्ये आले , तर कार्यालयात १० मिनिटे बसतात व निघून जातात. ग्रामसेवक वेळेवर येत नसल्याने गावाचा विकास खुंटला असून, विद्यार्थी व नागरिकांची विविध दाखल्यांसाठी अडचण निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ग्रामसेवक वेळेवर येत नसल्याने ग्रामस्थ, विद्यार्थी ग्रामपंचायत कार्यालयात विविध दाखल्यांसाठी हेलपाटे मारत आहेत.

.       विद्यार्थी व ग्रामस्थांना आवश्यक असणारी दाखले वेळेवर मिळत नाही. अशीच परिस्थिती त्यांचेकडे प्रभार असलेल्या मिनघरी आणि अंतरगाव या गावामध्ये सुद्धा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वास्तविकता अशी की, ग्रामपंचायत स्तरावरील कामकामात सुसूत्रता आणणे आणि नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांचे कार्यालयीन वेळापत्रक जिल्हा परिषद प्रशासनाने आखून दिले आहे. या वेळापत्रकानुसार हजर न राहणाऱ्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगाही उगारण्यात येणार आहे. असे असूनही ग्रामसेवक संदीप घोणमोडे त्यावेळेनुसार कार्यालयात कधीच येत नाही. असा आरोप करून तिन्ही गावातील नागरिकांनी ग्रामसेवक संदीप घोनमोडे यांची तिन्ही ग्राम पंचायत मधून त्वरित हकालपट्टी करावी. अशी मागणी प्रसार माध्यमातून केली जाग आहे.

मी जरी वेळेवर येत नाही तरी सुद्धा मी तेथील नागरिकांचे प्रश्न सोडवितो. माझ्या साज्यातील तिन्ही गावे एकाच रोडवर असल्यामुळे मी एकाच दिवशी तिन्ही कार्यालयात जाऊन दाखल्यावर सह्या करतो.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       संदीप घोणमोडे, ग्रामसेवक, ग्राम पंचायत कार्यालय नाचनभट्टी