जिल्हाधिकारी साहेब रामाला तलाव वाचवा हो वाचवा

401

 रामाला तलाव संरक्षण व संवर्धन संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांना साद 

चंद्रपूर : शहरातील एकमेव ऐतिहासिक रामाला तलावाचे वाढत्या अतिक्रमणा पासुन संरक्षण करण्यासाठी त्वरित उपाय योजना करण्यात यावी, तलाव बुजविण्याचे प्रयत्न थांबवावे,तलावात झालेल्या अवैध बांधकामाची अतिक्रमणे काढण्यात यावी, तसेच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व जलस्त्रोतांना सुरक्षित आणि प्रदुषण मुक्त करण्यात यावे। जलस्त्रोतांच्या अतिक्रमणा बाबत मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचे आणि भारत सरकार च्या जल संसाधन मंत्रालयाच्या स्ट्यांडिंग कमेटी ने सन 2015 – 16 साली घेतलेल्या निर्णयांची त्वरित अंमल बजावणी करुन रामाला तलावाचे संरक्षण जिल्हा प्रशासनाने करावे अशी मागणी रामाला तलाव संरक्षण व संवर्धन संघटनेने जिल्हाधिकारी गौडा यांना एक निवेदन देउन केली आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रतिनिधी मंडलास दिले.

.        रामाला तलाव संरक्षण व संवर्धन संघटनेने बुधवार दि 28 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी विनय गौडा यांचेशी रामाला तलावाच्या संदर्भात चर्चा करुन निवेदन दिले. मनोज जूनोनकर यांनी रामाला तलावाची स्थिती विषद करित सांगीतले कि रामाला तलाव 158 एकर परिसरात होता पण आज फक्त 92 एकर राहिलेला आहे, त्यातही मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढतच आहेत। मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जलस्त्रोतां चे संरक्षण करण्याची जवाबदारी जिल्हाधिकारींची आहे। जलस्त्रोतांमधे अतिक्रमणे होणार नाही, जर झाली तर ताबडतोब काढण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी यांनी करावी।अश्याच प्रकार चे निर्देश भारत सरकारच्या जल संसाधन मंत्रालयाच्या स्ट्यांडिंग कमेटी ने ही दिलेले आहेत। त्या आदेशांचे तातडीने पालन करुन तलावाचे संरक्षण करावे.

.       प्रा डॉ.जुगलकिशोर सोमाणी म्हणाले, चंद्रपूर शहरातील जल व्यवस्थापनेसाठी पूर्वी सहा तलाव होते त्या पैकी पांच तलाव अतिक्रमणाच्या दुष्ट चक्रात नष्ट झालीत आता फक्त रामाला तलाव शिल्लक आहे तो ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। या तलावाच्या अस्तित्वाने शहरातील मोठ्या भागात भूजल समाधान कारक आहे।जर हा तलाव नष्ट झाला तर मानवी जिवना चे मोठे नुकसान होईल , म्हणून प्रशासनाने गंभीरतेने लक्ष देऊन तलावाचे संरक्षण करावे.

.       नदी स्वच्छता अभियानाचे प्रवर्तक मुरलीमनोहर व्यास म्हणाले, राज्य शासन जल संसाधनवृद्धि साठी नव नविन जलस्त्रोंतांच्या वृध्दि साठी खर्च करित आहे, आणि चंद्रपूर शहरातील प्राचीन ऐतिहासिक रामाला तलाव अतिक्रमणाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। कांही समाज विघातक लोक सतत अतिक्रमणे करित आहेत । संबंधित अधिकारी लक्ष देत नाहीत। ही सर्व अतिक्रमणे जिल्हाधिकारी महोदयांनी स्वत; लक्ष देऊन थांबवावी. जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले जिल्हा प्रशासन या बाबत योग्य ती कार्यवाही करुन तलावाचे संरक्षण करणार. नागरिकांनी अशी अवैध कामे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून द्यावी. ही अवैध अतिक्रमणे होत होती तेंव्हांच संबंधित अधिकारीगणांनी थांबविणे आवश्यक होते, पण आता असे होणार नाही.

.       जिल्हाधिकारी महोदयां सोबत प्रतिनिधी मंडलाच्यावतीने मनोज जूनोनकर, मुरलीमनोहर व्यास आणि प्रा डा जुगलकिशोर सोमाणी यांनी चर्चा केली. या प्रसंगी रामाला तलाव संरक्षण व संवर्धन संघटनेच्या अनेक सदस्यांसोबत शहरातील अनेक सामाजिक संस्थांचे आणि विविध व्यापारी संघटनांचे शेकडो सदस्य जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित होते. निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित लोकांना मनोज जूनोनकर यांनी जिल्हाधिकारींशी झालेल्या चर्चें ची माहिती दिली. व्यापारी आणि उद्योजक फेडरेशन चे अध्यक्ष रामकिशोर सारडा यांनी रामाला तलाव संरक्षण करण्यासाठी सर्व व्यापारी आणि उद्योजक संघटना रामाला तलाव संरक्षण व संवर्धन संघटनेच्या सोबत राहिल असे आश्वासन दिले.

.       या प्रसंगी सर्वश्री मदनगोपाल पांडीया, दिनेश बजाज, रोडमल गहलोत, चुडामण पिपरीकर, रामकिशोर सारडा, मुकुंद गांधी, अड नंदूरकर, डा गोपाल मुंदडा, हनुमान बजाज, बंडू धोत्रे, नितेश चांडक, विजय करवा, हेमंत चांडक, रमेश मुंदडा, संदीप माहेश्वरी, नितीन सोनी, सुधीर बजाज, दीपक सोमाणी, प्रविण सारडा, प्रभाकर मंत्री, प्रशांत गडपल्लीवार, प्रह्लाद शर्मा, सुनील भट्टड, विलास वानखेडे आदि शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारीगण उपस्थित होते.