शेणगाव येथे शुल्लक कारणावरून मजुराची हत्या

401

पाच जण पोलीसाच्या ताब्यात

हत्येच्या घटनेने पुन्हा चंद्रपूर जिल्हा हादरला

२ महिन्यात १३ हत्या

चंद्रपूर : रविवार 3 मार्च ला नागभीड तालुक्यातील मौशी येथील तिहेरी हत्याकांडाने चंद्रपूर जिल्हा हादरून गेला होता, पुन्हा सोमवारी घुग्घुस पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेणगाव येथे क्षुल्लकच्या कारणातून झालेल्या वादात एका मजुराची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अक्षय गौतम मिस्त्री (२९, रा. विवेकानंदपूर, मुलचेरा तालुका, आलापल्ली) असे मृतकाचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याच सोबतच्या सहकारी पाचजणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

.        मागील दोन महिन्यांत जिल्ह्यात तब्बल हत्येच्या १३ घटना घडल्या असल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख सतत वाढतीवरच असल्याचे दिसून येत आहे घुग्घुस नजीकच्या शेणगाव येथे पाण्याच्या टाकीचे काम करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली तालुक्यातील काही मजूर कामाला आले आहेत. त्यांच्यासोबत अक्षयही काम करण्यासाठी आला होता. ते शेणगाव येथेच वास्तव्यास होते. दरम्यान, दि. ३ मार्च रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास त्यांच्यामध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. यात अक्षयच्या डोक्याला गंभीर मार लागला. यातच त्याचा मृत्यू झाला. घुग्घुस पोलिसांनी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी सोमवारी सायंकाळी पाच जणांना ताब्यात घेतले. पुढील तपास घुग्घुस पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

.        नव्या वर्षात नवे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन हे फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात रुजू झाले मात्र या दरम्यान हत्येचे सत्र झपाट्याने वाढत गेले, 2 महिन्यात 13 हत्येच्या घटनेने चंद्रपूर आता हत्यापुर झाले असल्याचे बोलल्या जात आहे.