आनंद निकेतन महाविद्यालयात ‘करिअर गायडन्स कोर्स’ चे आयोजन

54

वरोरा : आनंद निकेतन महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने बी. कॉम. च्या विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर गायडन्स कोर्स’ कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम ‘भारतीय कंपनी सचिव संस्था’ नागपूर तर्फे घेण्यात आला होता.

.         ‘कंपनी सेक्रेटरी ‘हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्या पायऱ्या पूर्ण कराव्या लागतात यासाठी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कंपनी सेक्रेटरी मोहित बत्रा यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. सर्व प्रकारच्या कंपन्यांमध्ये कंपनी सेक्रेटरीचा खूप  महत्त्वाचा सहभाग असतो असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कोणत्याही कंपनीचे रुल आणि रेगुलेशन चे  काम करण्यासाठी कंपनी सेक्रेटरी ची निवड केली जाते. हा या कोर्स चा फायदा त्यांनी विद्यार्थ्यांना पाठवून दिला. तसेच’ कंपनी सेक्रेटरी’ कोर्स केल्यावर तुम्हाला भविष्यात करिअर घडवण्यासाठी अनेक स्कोप आहे असे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.

.         या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून दिनेश बोरीकर यांनी ‘कंपनी सेक्रेटरी कोर्स’ ला ऍडमिशन कशी घ्यावी आणि ऍडमिशन घेताना काय काय फॉर्मॅलिटी करावी लागते याची विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या शेवटी एक प्रश्नोत्तराचे सत्र झाले आणि मुलांनी आपल्या अडचणी समजून घेतल्या.’ कंपनी सेक्रेटरी’ या कोर्स विषयी विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन मोहित बत्रा यांनी केले.

.         या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभागाचे जेष्ठ प्रा. डॉ. चौधरी यांनी केले. आणि कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. कल्पना काळे यांनी केला. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन डॉ. पल्लवी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. संदीप ताजने  यांनी केले.

.         या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाणिज्य विभागाचे प्रा. विशाखा, प्रा. फराना, प्रा. मंगेश, प्रा. टिपले, प्रा. राहुल यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.