बल्लारपुरात रेती तस्करीच्या तीन ट्रॅक्टरवर कारवाई

34

मंडळ निरीक्षकाने केली जप्त

तस्करांचे धाबे दणाणले

कोठारी : बल्लारपूर तालुक्यात आज शुक्रवार ला दहेली गावाजवळ तीन रेती भरलेले ट्रॅक्टर आढळून आले.मंडळ निरीक्षक यांनी त्यास थांबवून चौकशी केली असता त्यांच्याजवळ परवाना आढळून आला नसल्याने त्यावर जप्तीची कारवाई करीत तहसील परिसरात ट्रॅक्टर जमा करण्यात आले.सदर कारवाई आज दि.२३ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यानची आहे.

.       बल्लारपुरात मंडळ निरीक्षक प्रकाश सुर्वे रुजू झाल्यापासून अवैध खनिज व रेती उत्खनन व वाहतुकीवर कारवाईचे सत्र सुरू केल्याने यस्करांचे धाबे दणाणले आहेत. आज मौज दहेली गावात राष्ट्रीय महामार्गावरून तीन ट्रॅक्टर क्र. एम एच ३४ ए पी ३३२६ ट्रॅली क्र. एम एच ३४ ए बी २८३१,एम एच ३४ ए पी ५३८८ ट्रॅली क्र.एम एच ३४ ए पी २१५४ व ट्रॅक्टर क्र. एम एच ३४ सी सी १४२९ ट्रॅली नंबर नसलेले बल्लारपूर येथील आरिफ खान,इलियास खान व करीम असिफ खान यांच्या मालकीचे असल्याचे समजते.

.       अवैध रेती व खनिज उत्खनन करून वाहतूक करण्याचा धंदा तालुक्यात तेजीत असून तालुका प्रशासनाकडून वारंवार कारवाई करूनही रेती तस्करीवर प्रतिबंध होत नसल्याने प्रशासनात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अशा कारवायांमुळे अवैध धंद्यावर आळा बसत असून लाखोंचा महसूल वाचविण्यात यश येत आहे. मात्र या कामावर असलेल्या अनेक मजूर कुटुंबाचा उदर निर्वाह बुडत अडून त्यांच्यापुढे रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित होत आहे.