गडबोरी येथील अवैद्य रेती साठा कुणाचा ?

108

 महसूल विभागाने त्वरित कारवाही करून साठा जप्त करण्याची मागणी 

सिंदेवाही :- जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका हा रेतीसाठी प्रसिद्ध असून महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ फेकून या तालुक्यातून अवैध्य रेतीची चोरटी वाहतूक सतत होतं असताना गडबोरी गावाजवळील राईसमील मागे शेकडो ब्रास अवैध्य रेतीचा साठा तयार केला असून हा रेतीचा साठा कुणी तयार केला ? याचा महसूल विभागाने शोध घेऊन साठा त्वरित जप्त करावा. अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

.         सिंदेवाही तालुक्यात मागील वर्षी रेतीच्या नऊ घाटांचा लिलाव करण्यात आल्याने शासनाला करोडो रुपयांचा महसूल मिळाला होता. यावर्षी अजूनही कोणत्याची रेती घाटांचा लिलाव झाला नाही. त्यामुळे तालुक्यात रेती तस्करीला प्रचंड उधाण आले आहे. गडबोरी गावालगत असलेल्या लाल चीचबोडी या घाटातून महसूल अधिकाऱ्याना हुलकावणी देत रात्रभर रेतीची तस्करी सुरू असते. मात्र याकडे कोणतेही महसूल कर्मचारी लक्ष घालत नाही. यावरून रेती तस्करांचे महसूल कर्मचारी यांचे सोबत साटेलोटे असल्याची चर्चा परिसरात सुरू असून गडबोरी गावाजवळील राईसमिल मागे कोणालाही दिसणार नाही अशा जागेमध्ये शंभराहून अधिक ब्रास रेतीचा अवैध्य साठा तयार करण्यात आला आहे.

.         सदर साठा कोणत्या रेती तस्करांचा आहे. कोणत्या विभागला तो रेतीसाठा पुरविण्यात येणार आहे. याची चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच संपूर्ण रेती साठा जप्त करण्यात यावा. अशीही मागणी सदर परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.