जि. प. शाळा कोटगाव येथे दोन दिवशीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

89

नागभीड : विद्यार्थ्यांचा सर्वागीन विकासाच्या दृष्टीने तथा त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी जि. प. प्राथमिक शाळा कोटगाव ( आदर्श ) येथे दोन दिवशीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

.         दिनांक ८ व ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या स्नेहसंमेलन दरम्यान सकाळी परिसर स्वच्छता, विद्यार्थ्यांच्या शारीरिक तथा बौद्धिक स्पर्धा, गावातील महिलासाठी रांगोळी स्पर्धा व संगीत खुर्ची स्पर्धा, नृत्य खरी कमाई उपक्रम, वेशभूषा स्पर्धा सह आदी स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे . या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड. गोविंद भेंडारकर हे राहणार आहे . तर प्रमुख अतिथी म्हणून प्रफुल खापर्डे विलास दोनाडे, संजय माकोडे, स्वप्नील मेश्राम, सुनील वाघमारे सरपंच, यशवंत भेंडारकर उपसरपंच, सतीश मेश्राम, व्ही. आर. ढोरे ग्रामसेविका, आनंद जांभुळे, रंजना बांबोळे, छाया भेंडारकर, अनिता नान्हे, अर्चना जांभुळे उपस्थित राहणार आहे.

.         यानंतर दिनांक ९ फेब्रुवारी ला विद्यार्थ्यांना चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण होणार आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रणाली खोचरे गटविकास अधिकारी, संजय पालवे गटशिक्षणाधिकारी,सुनीता भंडारे विस्तार अधिकारी, संतोष रडके तालुका अध्यक्ष भाजपा, प्रमोद नान्हे केंद्र प्रमुख, छाया मरगडे मुख्याध्यापिका, नत्थू सहारे, आशिष काटेखाये, आनंद मेश्राम पत्रकार, देवा नागापुरे उपस्थित राहणार आहे.