बल्लारपूर तालुक्यातील गावागावात ई. व्ही. एम. व व्ही. व्ही. पटचे प्रात्यक्षिक

29

निवडणूक आयोगाचा ई व्ही एम मशीन बाबत संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न

मतदारांना मतदान केल्याबाबत व्ही व्ही पट दर्शविते

विसापूर : राज्यात यंदाचे वर्ष लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे आहे.विरोधातील राजकीय पक्ष व सामान्य मतदार ई व्ही एम मशीन बाबत शंका घेत आहेत.तसे ते अनेकदा प्रसार माध्यमातून व्यक्त होत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बल्लारपूर तालुक्यातील गावागावात ई व्ही एम व व्ही व्ही पटचे प्रात्यक्षिक दाखवून जनजागृती केली जात आहे.या माध्यमातून निवडणूक आयोग मतदारातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.

.         बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मूल येथील उपविभागीय कार्यालयाच्या वतीने बल्लारपूर तालुक्यातील १७ ग्रामपंचायत अंतर्गत ई व्ही एम मशीनचे प्रात्यक्षिक दाखवून मतदारात जागृती केली जात आहे. मतदारांनी ज्याला मतदान केले,ते मतदान प्रत्यक्ष व्ही व्ही पँट वर दिसते. मतदारांनी केलेले मतदान बॅलेट यंत्रात जमा होते.मत मोजणी दरम्यान बॅलेट यंत्रातील मतांचीच मोजणी केली जाते,असे प्रात्यक्षिक दाखविणारे तलाठी शंकर खरुले यांनी मतदारांना पटवून दिले.
दरम्यान एका एल ई डी चित्र रथाच्या माध्यमातून मतदारांनी निर्भयपने मतदानाचा हक्क बजवावा म्हणून गावागावात जनजागृती करण्यात येत आहे.

.         ही मोहीम बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा मूल चे उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांच्या मार्गदर्शनात कोठारीचे मंडळ अधिकारी सुजित चौधरी, तलाठी शंकर खरुले, कोतवाल पुंजाराम राऊत, अमोल डोंगरे, चित्र रथाचे चालक अशोक शिवणकर यांच्या माध्यमातून बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, नांदगाव (पोडे), हाडसती, बामणी (दुधोली), दहेलि, लावारी, कळमना, कोर्टीमक्त्ता, पळसगाव, आमडी, किन्ही, कोठारी, काटवलि (बामणी), कवडजाई, मानोरा, इटूोली व गिलबिली आदी ग्रामपंचायत क्षेत्रात ई. व्ही. एम. व व्ही. व्ही. पँटचे प्रात्यक्षिक दाखवून मतदारांत जनजागृती करण्यात आली.