महामार्ग पोलिसांकडून वाहनचालकांचे प्रबोधन
कोंडा फाटा येथे 34 वा रस्ता सुरक्षा सप्ताह
चंद्रपूर : 34 वा रस्ता सुरक्षा सप्ताहाअंतर्गत महामार्ग पोलिस केंद्र चंद्रपूर तर्फे भद्रावती कोंडा फाटा येथे महामार्ग पोलिसांकडून वाहनधारकांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी वाहनधारकांना थांबवून मोटार वाहन कायद्याविषयी जनजागृती करून माहिती देण्यात आली.
. रस्त्यावर वाहन चालविताना वाहतूक नियमांचे योग्य पालन व्हावे, याकरीता राष्ट्रीय व राज्य महामार्गावर वाहनचालकांना थांबवून त्यांना वाहतुकीचे नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. वाहन चालवितांना हेल्मेट परिधान करणे चारचाकी वाहनांमध्ये सिटबेल्टचा उपयोग करणे, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, आदी नियमांबाबत जनजागृती करण्यात आली.
. यावेळी महामार्ग पोलिस केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र खेरकर, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल मोरे, पोलिस उपनिरीक्षक उमाकांत गौरकार, पोलिस उपनिरीक्षक किरण पाटील, काशिनाय निगोर, प्रमोद पिसे, विजेंद्र वाढई, पुंदलकर, व सर्व कर्मचारी उपस्थित होते. मी आहे यम..नियमांचे पालन न केल्यास होईल..मृत्यूदंड असा संदेश यम..च्या वेशभूषेत प्रतिकात्मक स्वरूपात वाहनचालकांना देण्यात आला.