हिरालाल लोया विद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

59

वरोरा : हिरालाल लोया विद्यालय वरोरा येथे दरवर्षी शासनाच्या तसेच शालेय स्तरावरील विविध कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले जाते हीच परंपरा कायम ठेवत यावर्षी सुद्धा विद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 22 ते 24 जाने दरम्यान करण्यात आले होते.

.         या कार्यक्रमाच्या उद्घघाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निराज गोठी अध्यक्ष भारत शिक्षण संस्था वरोरा हे होते तर उदघाटक म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर, प्रमुख पाहुणे कृष्णकांत लोया सचिव रामजी लोया सचिव, मुख्याध्यापक रविकांत जोशी, पर्यवेक्षक अर्चना ढोले, प्रभाकर ढाले, महेश डोंगरे, उप प्राचार्य परसराम पवार उपस्थित होते.

.         कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी विद्यार्थ्यांनी सुंदर असे पथसंचलन सादर केले व पाहुण्यांना सलामी दिली व क्रीडा ज्योत पेटवून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. उदघाटना नंतर दिवसभर विद्यार्थ्यांनी विविध खेळांचा आनंद घेतला. त्या नंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विविध नृत्य प्रकार एकांकिका विद्यार्थ्यांनी सादर केल्या. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात तिसऱ्या दिवशी विद्यार्थी व शिक्षकांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी खूप सुंदर फिल्मी भावगीते गाणे गायले सुंदर अश्या गाण्यांच्या मेजवानी नंतर भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव, व सर्व पदाधिकारी तसेच सर्व अधिकारी, सर्व अध्यापक अध्यापिका, सर्व विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी रुचकर जेवणाचा आस्वाद घेतला आणि हा अविस्मरणीय कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. या कार्यक्रमाचे सर्व श्रेय मुख्याध्यापक रविकांत जोशी, पर्यवेक्षक अर्चना ढोले, प्रभाकर ढाले, महेश डोंगरे, सर्व शिक्षक, शिक्षिका, सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांना आहे.