आता भद्रावती येथे सामाजिक भावनेतून घडणार कलावंत

52

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कल्चरल सेंटरची बांधिलकी    

भद्रावती

.         अनेक कलावंत आणि लोककलावंतांचे स्वप्न असतं की आपल्या आयुष्यात काहीतरी नवीन घडावं असंच एक स्वप्न उराशी बाळगून अनिरुद्ध वनकर नावाचा कफल्लक कलावंत आपल्या स्वकष्टाने भद्रावती तालुक्यातील टाकळी या गावी अडीच एकर जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कल्चरल सेंटर (बाईक) नावाचे एक सांस्कृतिक केंद्र उभे केलें आहे. यातून भद्रावतीच नव्हे तर देशभरातून सामाजिक बांधिलकी जपणारे कलावंत घडतील आणि राष्ट्र निर्माणात आपले योगदान देतील असा विश्वास या केंद्राने व्यक्त केला आहे.

.         या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज खुले रंगमंचाची निर्मिती झाली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कल्चरल सेंटर असे नाव दिलेल आहे तर .क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले या नावाने ट्रेनिंग हॉल पूर्ण झालेला आहे. महात्मा गांधी झाडीपट्टी प्रदेश सांस्कृतिक संग्रहालय, डॉक्टर अब्दुल कलाम सांस्कृतिक संशोधन केंद्र ,वामनदादा कर्डक संगीत व नाटक कारखाना, बिरसा मुंडा आदिवासी नृत्य लोककला विभाग, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालय व अभ्यासिका केंद्र निर्माण होणार आहे.या संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचं केंद्र उभे झालेले आहे.

.         या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कल्चरल सेंटर च्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष महाराष्ट्रातील माजी मंत्री व सध्याच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते नामदार विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे तर प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषद चे आमदार सुधाकर अडबले आणि सीसीआरटी संस्कृती मंत्रालय भारत सरकार नवी दिल्लीचे चेअरमन डॉक्टर विनोद इंदुरकर प्रमुख उपस्थितीमध्ये लाभणार आहे या संपूर्ण सोहळ्यामध्ये सिद्धार्थ गायकवाड प्रादेशिक उपायुक्त सामाजिक न्याय विभाग नागपूर ,डॉ. अनिल हिरेखन कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली , तहसीलदार अनिकेत सोनवणे भद्रावती, बिपिन इंगळे ठाणेदार भद्रावती, बापूसाहेब गजभारे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन नांदेड, प्रा डॉक्टर इसादास भडके, इंजिनियर भास्कर चव्हाण, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, वंचित बहुजन आघाडी चे नेते कुशल मेश्राम, शिवसेना भद्रावती रवी शिंदे, एडवोकेट भूपेंद्र रायपुरे, भीम आर्मी अध्यक्ष सुरेंद्र रायपुरे, गोपाल अमृतकर, आणि काही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कल्चरल सेंटरचे उद्घाटन होणार आहे.

आत्मनिर्भर कलावंत घडण्यासाठी                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                               बाईक मध्ये देशभरातील कलावंत निर्माण करून अभ्यासाची गोडी आणि व्यसनमुक्त कलावंत तयार करणे हे अत्यंत महत्त्वाचे केंद्रस्थान या ठिकाणी राहणार आहे या सेंटर मधून कोणत्याही वयोगटातील मुला मुलींना स्त्री-पुरुषांना प्रशिक्षित करून त्यांना स्वतःच्या पायावर उभ करणे त्यांना भविष्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये असा हा या इंटरनॅशनल सेंटरचा मानस राहणार आहे. यानंतर आम्ही लगेचच भारतातील तज्ञांकडून तीन दिवसीय एक्टिंग आणि नाटकांचे धडे देणार आहोत.

 मोफत होणार ऐतिहासिक नाटक                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                            13 जानेवारीला रात्री उद्घाटन सोहळ्यानंतर चुडाराम बल्हारपुरे यांनी लिहिलेले गोंडवानाचा महायोद्धा वीर बाबुराव शेडमाके हे नाटक मोफत रसिकांपुढे सादर होणार आहे यामध्ये 35 कलावंत कार्यरत असून या नाटकाचा निर्माता आणि दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर आहेत अनिरुद्ध वनकर हे या बाईक म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक असून ते लोक जागृती संस्थेचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि म्हणूनच या संपूर्ण सेंटरमध्ये अनेकांनी आपली उपस्थिती दर्शवावी आणि या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन बाईकचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुध्द वनकर यांनी पत्रका द्वारे कळविलेले आहे आणि 35 कलावंताचं प्रमाणपत्र वाटप होणार आहे नाटक निशुल्क असल्यामुळे आपण वेळेचे भान ठेवून वेळेवरती सात ते दहा या वेळेस उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात येत आहे.