अर्थसंकल्पात आदिवासी उपाय योजनेअंतर्गत 30 कोटींच्या विकास कामांना मंजुरी

51
  • विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांच्या प्रयत्नांना यश
  • – सिंदेवाही सावली तालुक्याचा समावेश

चंद्रपूर

ब्रह्मपुरी मतदार संघातील सिंदेवाही व सावली तालुक्यातील आदिवासी गावांना जोडणारे रस्ते व पूल बांधकामा करिता राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार यांनी आपल्या अथक प्रयत्नातून शासन स्तरावरून 30 कोटींचा निधी खेचून आणला असून या विकास कामांमुळे ग्राम खेड्यातील नवनिर्मानाधिन दळणवळण रस्ते व पूल यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

.          नुकतेच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात संपूर्ण राज्याच्या विकासासाठी पेटून उठत विविध प्रश्नांतून राज्यातील समस्यांना वाचा फोडणारे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी जनसामान्यांच्या समस्यांना घेऊन सभागृहाचे लक्ष वेधले. यात अनेक अशा मागण्यांना सभागृहांनी मान्यता दिली. यामुळे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. सोबतच ब्रह्मपुरी मतदार संघातील प्रलंबित विकासकामांच्या मागण्या रेटून धरत ग्रामीण भागातील आदिवासी गावांना जोडणारी पूल व दळणवळणाचे रस्ते यांच्या नवनिर्माण दिन कार्याकरिता तसेच मजबुतीकरण व बांधकामा करिता शासन स्तरावरून तीस कोटींचा निधी खेचून आणत पुनश्च एकदा वडेट्टीवारांनी विकासाचा झंजावात कायम ठेवला आहे.

.         अर्थसंकल्पात आदिवासी उपाय योजनेअंतर्गत सिंदेवाही तालुक्यातील खैरी ते गुंजेवाही रस्ता ग्रामीण मार्ग 27 मजबुतीकरण व सुधारणा करणे याकरिता 80 लक्ष, मरेगाव – खैरी – पवणपार ग्रामा 26 मजबुती व सुधारणा करणे 50 लक्ष, चिकमारा मांगली ते गुंजेवाही रस्ता ईजीमा 129 मजबुती व सुधारणा करणे करिता 70 लक्ष, वाकल जामसाळा रस्ता ग्रामा 56 मजबुती व सुधारणा करणे 3 कोटी 50 लक्ष, खैरी गुंजेवाही रस्ता ग्रामा 27 मजबुतीकरणासह सुधारणा करणे 80 लक्ष, मरेगाव खैरी पवनपार रस्ता ग्रामा 26 1.50 कोटी, सावली तालुक्यातील रामा 375 ते उसर पार तुकून मंगरमेंढा रस्ता ग्रामा 109 मजबुती करण्यासह सुधारणा करणे 2.52 लक्ष, सिंधुबाई तालुक्यातील टेकरी प्रजीमा 30 ते कन्हाळगाव रस्ता ग्रामा 29 रस्ता संरक्षणासह सुधारणा करणे 80 लक्ष, तर पूल बांधकामांमध्ये सिंदेवाही तालुक्यातील सिंदेवाही – रामाळा- गडबोरी वासेरा रस्ता प्रजीमा 43 वर लहान पूलाचे बांधकाम करणे 1.50 कोटी, याच मार्गावरील मोठ्या पुलाचे व बंधाराचे बांधकाम करणे 8 कोटी, टेकरी प्रजीमा 30 ते कन्हाळगाव रस्ता ग्रामा 29 लहान पूलाचे बांधकाम करणे 3.50 कोटी, मरेगाव खैरी पावनपार रस्ता ग्रामा 26 वर लहान पूलाचे बांधकाम करणे 2.50 कोटी, नाचनभट्टी ते प्रतिमा 116 रस्ता ग्रामा वर लहान पूलाचे बांधकाम करणे 2.50 कोटी, प्ररामा 9 देलंनवाडी रत्नापूर शिवनी ते प्रजीमा 44 ला जोडणारा रस्ता प्रजिमा 116 वर लहान पुलाचे बांधकाम करणे 1.25 कोटी आधी विकास कामांचा यात समावेश आहे. लवकरच सदर विकास कामांना सुरुवात होणार असून यामुळे ग्रामखेड्यातील नागरिकांना दिलासा मिळणार असून राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विकासाच्या झांजवाताने क्षेत्रातील ग्राम खेड्यांचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे.