नंदोरी येथे वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी उत्साहात 

64

चंद्रपूर

.        भद्रावती तालुक्यातील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने नंदोरी येथील लहान हनुमान मंदिर देवस्थान येथे १ जानेवारी ते ३ जानेवारी दरम्यान  वं राष्ट्रासंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा पार पडला.यावेळी पालखी मिरवणुकीत व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

.        तीन दिवसाच्या कार्यक्रम दरम्यान घटस्थापना, ध्यान आणि भजन संध्या कार्यक्रम घेण्यात आला. भजन संध्या कार्यक्रमात भजन मंडळानी उत्कृष्ठ गायन करून राष्ट्रसंतांना श्रद्धांजली अर्पित केली.दुसऱ्या दिवशी सकाळी ध्यान धारणा करून  प्रार्थना करण्यात आली.

.        त्यानंतर वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेसह भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील विविध  भजन मंडळीचा सहभाग घेतला. त्यानंतर ह.भ.प.पांडुरंग लांबट महाराज, घाटे महाराज यांचे राष्ट्रसंतांच्या जीवनावर आधारित कीर्तन करून संतांच्या विचारावर मार्गक्रमण करण्याचा सल्ला दिला.त्यानंतर सामुदायिक प्रार्थना,राष्ट्र वंदना,गोपाळकाला आणि महाप्रसाद वितरण करून राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

.        कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष देवीदास उमरे, प्रभाकर मांडवकर, तुळशीदास लांबट, विनोद लांबट, विवेक एकरे,  रवी खाडे, सरपंच मंगेश भोयर, उपसरपंच उषा लांबट, माजी सरपंच शरद खमानकर, वैंनगंगा व्हॅली उत्पादक महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, भानूदास ढवस, ग्राम पंचायत सदस्य किशोर उमरे, गुरुदेव हरणे व गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.