पत्रकारांनी लेखणीतून सामाजिक उत्थानाचे पडसाद उमटवावे

24

चंदनसिंग चंदेल यांचे प्रतिपादन : विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

विसापूर 

.           लोकशाहीचे चार स्तंभ आहे. यापैकी आजही सर्वसामान्यांचा विश्वास पत्रकारितेवर टिकून आहे. यातील काही जण या क्षेत्रात नकारात्मकता जोपासतात.मात्र सकारात्मक पत्रकारिता समाजाला दिशा देते.पत्रकारांनी लेखणीतून प्रेरणादायी व सामाजिक उत्थानाचे पडसाद उमटवावे,असे प्रतिपादन वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष व भाजपाचे जेष्ठ नेते चंदनसिंग चंदेल यांनी बल्लारपूर येथील पत्रकार संघाच्या कार्यक्रमात केले.

.           बल्लारपूर तालुका महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने संत तुकाराम महाराज सभागृह येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून सामाजिक, क्रीडा, कला, शिक्षण, राजकीय, क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ घेण्यात आला.यावेळी अध्यक्षस्थानावरून चंदनसिंग चंदेल बोलत होते.

.           यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून चदनसिग चन्देल, चबिल्ट ग्राफिक्सचे एच.आर. अजय दुरटकर, बल्लारपूरचे वन परीक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे, सहायक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, जेष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, प्रा.डा. विजय सोरते, भाजपाचे शहर अध्यक्ष काशी सिंग, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हापाध्यक्ष मुन्ना खेडकर यांची उपस्तिथी होती.

.           तत्पूर्वी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, दिवंगत मधुकर रणदिवे, यांच्या प्रतिमेला मालर्पण व दीप प्रजवलीत करून कार्यक्रमाचे उदघाट्न करण्यात आले. दरम्यान राजेंद्र आर्य, अड.आर.आय.सय्यद, मंगेश रेगुंडवार, अनिल पांडे, श्रुती लोणारे, श्रीकांत आंबेकर, आदर्श मिश्रा, अड.रोहिणी सुरपाम, अड.प्रियंका चौव्हाण, साहिल गोरघटे यांचा विविध क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल शाल, श्रीफळ, स्मुर्तीचिन्ह प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अजय रासेकर यांनी केले. यावेळी पत्रकार बंधू व शहरातील गनमान्य नागरिक उपस्थित होते.