ग्रामपंचायत सिरपूर येथील शिपाई पदाच्या परीक्षेत घोळ

30

उमेदवारांचा आरोप : फेरपरिक्षा घ्या

पालकमंत्री व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन

नेरी

.         चिमूर तालुक्यातील नेरी जवळील सिरपुर ग्रा प मध्ये रिक्त झालेल्या शिपाई या पदा साठी लेखी परीक्षा दि 17 डिसें ला घेण्यात आली मात्र सदर परीक्षेत घोळ करण्यात आला परीक्षार्थींना प्रश्न काढून देत असताना अनेक गैरप्रकार झाला असून परीक्षेच्या ठिकाणी अनेक नागरिक ये जा करीत होते त्यामुळे गोधळ निर्माण होऊन परीक्षा देणाऱ्या उमेदवाराना नाहक त्रास झाला होता तर काही उमेदवार हे प्रवेश पत्र आणण्याच्या निमित्ताने बाहेर जात होते त्यामुळे ह्या लेखी परीक्षेत गैरप्रकार झाला असल्याचा आरोप ह्या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी केला असून सदर परीक्षा रद्द करून पारदर्शक पद्धतीने पुन्हा एकदा फेरपरिक्षा घेण्याची मागणी करीत आशिष रामभाऊ बोरकर व इतर उमेदवारांनी जी प चे मुख्यकार्यकारी अधिकारी तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, याना निवेदन देण्यात आले.

.         सिरपुर ग्रा प चे शिपाई यांची पदोन्नती झाल्यामुळे शिपाई ची जागा रिक्त झाली त्यामुळे या पदासाठी इच्छुक उमेदवारांचे नामांकन मागविण्यात येऊन दि 17 डिसें ला परीक्षा घेण्यात आली यात अनेक उमेदवानी भाग घेतला मात्र परीक्षा ही पारदर्शक पद्धतीने न घेता थातूर माथूर घेण्यात आली या परीक्षेचे प्रश्न ग्रामसेवक आणि सर्व सदस्य यांनी काढले असता काही गैरप्रकार घडल्याचे निदर्शनात आले तसेच अनेक नागरिक ग्रा प मध्ये ये जा करीत होते याचाच गैरफायदा घेऊन काही निवडक उमेदवारांना मदत सुद्धा करण्यात आली प्रश्न आपल्याच उमेदवारांना मदत होईल असे काढण्यात आल्याचा आरोप आशिष रामभाऊ बोरकर व इतर उमेदवारांनी केला आहे त्यामुळे सदर परीक्षा रद्द करून पुन्हा पारदर्शक परीक्षा घेण्यात यावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर, पालकमंत्री याना निवेदन सादर करण्यात आले निवेदन देताना अविनाश निकुरे,अक्षय गावतुरे,अमृत बोरकर,प्रशांत बोरकर,अजय गावतुरे अमोल मोहूर्ले शिल्पा मोहूर्ले रितीक गेडाम स्वराज निकोडे उपस्थित होते