गडचांदूर येथे 26 व 27 डिसेंबर ला दत्त जयंती महोत्सव चे आयोजन

33

गडचांदूर

.          श्री गुरुदेव दत्त मंदिर, गडचांदूर येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा दत्त जयंतीच्या निमित्ताने गुरू दत्तात्रेय जयंती महोत्सव चे आयोजन 26 व 27 डिसेंबर ला करण्यात आले आहे. या दरम्यान विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

.         26 डिसेंबर ला सकाळी 8 वाजता गणेश मूर्ती व महादेव पिंड यांची प्राणप्रतिष्ठा होईल, त्यानंतर मंदिरातून पालखी व कलश यात्रा निघेल,गावातील प्रमुख मार्गाने भ्रमण करीत दत्त मंदिरात विसर्जित होईल,दुपारी 12 वाजता भजन व काल्याचे कीर्तन होईल. तर 27 डिसेंबर ला सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत महाप्रसाद चे वितरण करण्यात येणार आहेत, तरी भाविकांनी या धार्मिक कार्यक्रम मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वरदान दुर्गा उत्सव मंडळ व दत्त मंदिर कमिटी च्या वतीने करण्यात आले आहे,