२१ जानेवारीला आनंद निकेतन महाविद्यालयात मराठी विषय शिक्षक पहिल्या अधिवेशनाचे आयोजन.

31

चंद्रपूर

.          कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षकांचे पहिले एक दिवसीय अधिवेशन २१ जानेवारी २०२४ ला आनंदवन वरोरा येथे आयोजित केले आहे.

.          कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने, कनिष्ठ महाविद्यालयात शिकवणाऱ्या मराठी विषय शिक्षकांचे पहिल्यांदाच एक दिवसाचे अधिवेशन कर्मयोगी बाबा आमटे यांच्या कार्याने पावन झालेल्या आनंदवन भूमीत, आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा येथे आयोजित करण्यात आले आहे.

.          हे अधिवेशन २१ जानेवारी २०२४ रविवारला होणार आहे. या अधिवेशनासाठी थोर साहित्यिक, विचारवंत, अभ्यासक्रम मंडळ सदस्य यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच मराठी विषयाच्या अभ्यासक्रमातील विविध घटकांवर परिसंवादाचे व खुल्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

.          तेव्हा चंद्रपूर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयात मराठी विषय शिकवणाऱ्या समस्त प्राध्यापकांनी या अधिवेशनात होणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. डॉ ज्ञानेश हटवार चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी म.रा., प्रा. डॉ सुधीर मोते जिल्हाध्यक्ष,
प्रा. डॉ माधवी भट उपाध्यक्ष,

.          प्रा. नरेंद्र विखार सचिव, प्राचार्य धर्मराज काळे कोषाध्यक्ष, प्रा. सरिता कांचेवार महिला प्रतिनिधी, प्रा. सालवटकर , प्रा. मुंडे, प्रा. बेलेकर वरोरा, प्रा. गजानन सातपुते चिमूर, प्रा. किशोर ढोक भद्रावती, प्रा. नामदेव मोरे चंद्रपूर, प्रा. केदार सावली, प्रा. विनोद कुनघाटकर पोंभूर्णा, प्रा. नंदकिशोर काकडे बल्लारशा, प्रा. गहाणे सिंदेवाही, प्रा.देवानंद प्रधान नागभिड, प्रा. विनय दडमल ब्रम्हपूरी, प्रा. मुंडे जिवती, प्रा. संतोष बांदूरकर गोंडपीपरी, प्रा. गेडाम राजूरा, प्रा. राऊत मुल तसेच समस्त मराठी विषय शिक्षक महासंघ चंद्रपूर जिल्हा व सर्व तालुका कार्यकारणीने केले आहे.