‘त्या’ प्रवेशद्वाराला विसापूर चे नाव द्या

42

विसापूर ग्रामपंचायतीची आग्रही मागणी

विसापूर फाट्यावर देखील प्रवेशद्वार उभारा

विसापूर

.          बल्लारपूर तालुक्यात विसापूर सर्वात मोठया ग्रामपंचायतीचे गाव असून लोकसंख्या १७ हजाराच्या आसपास आहे.गावाच्या हद्दीत जागतिक स्तरावरचे वनस्पती उद्यान,भव्य तालुका क्रीडा संकुल, सैनिक शाळा,औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलांची निवासी शाळा,मुलींचे वसतिगृह आदींच्या इमारती डाौलाने उभ्या आहेत.याच परिसरात एस.एन. डी. टी. चे महिला विद्यापीठाचे उपकेंद्र लवकरच आकारास येणार आहे. चंद्रपूर – बल्लारपूर राज्य महामार्ग दरम्यान वनस्पती उद्यान जवळ प्रवेशद्वार उभारले आहे. ‘ त्या ‘ प्रवेशद्वाराला विसापूरचे नाव देण्याची आग्रही मागणी ग्रामपंचायतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना करण्यात आली आहे.

.          चंद्रपूर जिल्ह्यातील वैभवात भर टाकणारे श्रदेय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान,विसापूर साकारत आहे.याच उद्यानाच्या जवळ सार्वजनिक बांधकाम विभागाने मोठे व आकर्षक प्रवेशद्वार उभारले आहे. मध्यंतरी वादळाने याची काहीशी पडझड झाली. त्या प्रवेशद्वाराला श्रदेय अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान,विसापूर असे नाव द्यावे,असी आग्रही मागणी विसापूरकरांनी केली आहे.त्याच प्रमाणे विसापूर फाट्यावर त्याच धर्तीवर मोठे व आकर्षक प्रवेशद्वार उभारावे. विसापूर गावाची ओळख निर्माण करण्याच्या अनुषंगाने प्रवेशद्वार उभारून गावाकऱ्यांना उपकृत करण्याची मागणी ग्रामपंचायतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कडे अनेकदा निवेदन सादर करून केली आहे. मात्र अद्याप पर्यंत यासंदर्भात काहीच हालचाल होत नसल्यामुळे गावाकऱ्यात नाराजीचा सूर दिसून येत आहे.

.          पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गावाकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन चंद्रपूर – बल्लारपूर राज्य महामार्गांवरील प्रवेशद्वाराला श्रदेय अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान विसापूर असे नाव द्यावे व विसापूर फाट्यावर विसापूर गावाचे नामाधीन करून मोठे प्रवेशद्वार उभारावे. यामुळे विसापूरकरांना दिलासा मिळणार आहे.

बल्लारपूर तालुक्याच्या हद्दीतील विसापूर गावात विविध प्रकल्प आकारास आले आहे.यामुळे गावाचे नाव देशाच्या नकाशावर झळकत आहे. गावाच्या हद्दीतील बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल मध्ये राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा प्रथमच होऊ घातल्या असून त्या ठिकाणी ग्रामपंचायत मार्फत नागरी सुविधा योजनेतून ५0 लाख रुपये खर्च करून दिवाबत्ती करण्याचे नियोजन केले आहे. आता श्रदेय अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान विसापूर जवळील प्रवेशद्वाराला हे नाव देणे,कर्मप्राप्त आहे. त्याच प्रमाणे आमच्या गावाचे महत्व अधोरेखीत करण्यासाठी विसापूर फाट्यावर नवीन प्रवेशद्वार उभारावे,ही आमची मागणी रास्त आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                  अनेकश्वर मेश्राम, उपसरपंच, ग्रामपंचायत विसापूर