सरळ सेवा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा द्या

81

 

  • आमदार प्रतिभा धानोरकर यांचे मुख्यमंत्र्याना निवेदन

चंद्रपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन राज्य शासनाने 75 हजार पदभरतीची प्रक्रिया सुरु करण्याचे घोषित केले होते. शासनाने परीक्षा शुल्कात देखील वाढ केली आहे. ग्रामीण भागातून मोठ्या शहरात जाण्याकरिता अधिकच्या आर्थिक भुर्दंड भावी अधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरळ सेवा परीक्षेसाठी मोठ्या शहरात तरुणांना जाण्याठी मोफत बस सेवा देण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनातून केली.

.               या निवेदनात आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, सरळ सेवा परीक्षेसाठी राज्यातील अनेक तरुण मोठ्या शहरात जातात. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी मोठ्या मेहनतीची आवश्यकता असते. मात्र, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या तरुणांना या परीक्षेसाठी जाण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे या तरुणांना मोफत बस सेवा देण्याची मागणी त्यांनी केली.

.                   या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी असेही म्हटले की, महाराष्ट्रात कुठेही परीक्षा देण्याकरिता बस प्रवास मोफत करावा. यामुळे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या तरुणांना मोठा दिलासा मिळेल. आमदार प्रतिभा धानोरकर यांची ही मागणी स्वागतार्ह आहे. या मागणीमुळे महाराष्ट्रातील अनेक तरुणांना मोठा फायदा होईल.