नंदोरी येथे राज्य स्तरीय वंध्यत्व निवारण शिबीर

95

सरपंच मंगेश भोयर यांच्या हस्ते उदघाटन

भद्रावती

.            पंचायत समिती भद्रावती अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना नंदोरी येथे राज्य स्तरीय वंध्यत्व निवारण शिबीर आयोजित करण्यात आले सदर शिबीराचे उद्घाटन . सरपंच मंगेश भोयर यांनी केले याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा असुन शेतीसाठी पशुधनाचे संवर्धन करणे महत्वाचे असल्याचे सांगितले,शेती पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय,शेळी पालन, कुक्कुटपालन व्यवसाय करणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.या शिबीराचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपापली जनावरांची तपासणी करुन निदान,व उपचार करण्याचे आवाहन केले.

उदघाटन करतांना सरपंच मंगेश भोयर

.            याप्रसंगी मार्गदर्शन करतांना जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी चंद्रपुर डॉ. उमेश हिरूडकर यांनी केंद्र पुरस्कृत नाविन्यपूर्ण योजना तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली व योजनांचा लाभ घेण्यासाठी आव्हान केले, डॉ. हेमंत घुई सहाय्यक पशुधन विकास अधिकारी चंद्रपुर, डॉ राहुल घिवे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी गोसदन प्रक्षेत्र सोमनाथ, यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी डॉ.यामिनी घुंगरे पशुधन पर्यवेक्षक नंदोरी, डॉ गोपाल गुल्हाने पशुधन पर्यवेक्षक घोडपेठ, डॉ.प्रफुल झाडे पशुधन पर्यवेक्षक मांजरी,सेवादाता श्रीनिवास ईदनुर, परिचर  पारशीवे,  उन्हाळे,  चौधरी यांनी परिश्रम घेतले.