नंदोरीत जगन्नाथ महाराजांचा पालखी सोहळा

236

3 दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन

चंद्रपुर

.        विदेही सदगुरू जगन्नाथबाबा संस्थान नंदोरीच्या वतीने १६ डिसेंबरला नंदोरीत जगन्नाथबाबा संस्थान पालखी सोहळा होणार असून १४, १५ व १६ डिसेंबर या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

.        या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी रंगनाथ स्वामी पतसंस्था शाखा वरोराचे संचालक परिक्षित एकरे, नंदोरीचे सरपंच मंगेश उर्फ श्रीहरी भोयर  राहणार असून या कार्यक्रमाचे उद्धाटन रमेश राजूरकर यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे विधानसभा प्रमुख तथा चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे, ग्राम पंचायत नंदोरी चे माजी सरपंच शरद खामनकर, भटाळी चे सरपंच सुधाकर रोहनकर, किसानपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र जिवतोड, ग्राम पंचायत सदस्य किशोर उमरे, मनोहर नायर, म. ज्यो.  फुले विद्यालय नंदोरी च्या मुख्याध्यापिका अश्लेषा भोयर, दैनिक नवजीवनचे जिल्हा प्रतीनिधी रवी खाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष घनश्याम ढवस, तंटामुक्ती अध्यक्ष किसन एकरे, तुळशीदास लांबट, देवीदास उमरे, माजी पोलिस पाटील अनिल ठेंगणे, माजी सभापती धनराज विरूटकर, रामकृष्ण मोंढे, ग्राम पंचायत सदस्य  किशोर उमरे, माजी उपसरपंच भानूदास ढवस, विनोद लांबट, विकास लांबट, जगदीश उमरे, विवेक एकरे, आनंदराव जिवतोडे, रमेश लांबट, गोपीनाथ बोबाटे, संतोष लांबट, प्रवीण लांबट, संजय पुनवटकर, मनोहर कांबळे, दौलत एकरे, आनंदराव दानव, घनश्याम लांबट, आनंदराव उरकांडे, शामराव एकरे, शंकर लेडांगे, स्वप्नील लांबट, मनिष ठक, शामराव खापणे, सुनील उमरे, ह.भ.प. पांडुरंग लांबट, बंडू भोयर, सुरेंद्र एकरे, हरी एकरे,  विठ्ठल अंड्रस्कर, उद्धव बलकी यांची उपस्थिती राहणार आहे.

.        गुरवारी सकाळी ६ वाजता परिसर स्वच्छता, ८.३० वाजता घटस्थापना, दुपारी १२ ते २ भजन श्री. गुरुदेव महिला भजन मंडळ नंदोरी बु, सायंकाळी ४ ते ६ अध्याय वाचन, ६ ते ८ हरिपाठ, रात्री ९ ते १२ भजन श्री. साई भजन मंडळ नंदोरी बु, शुक्रवारी सकाळी ७ वाजता काकड आरती, १२ ते ४ भजन श्री. संत गाडगेबाबा महिला भजन मंडळ नंदोरी बु, रात्री ८ ते १० भजन प्रगती महिला भजन मंडळ नंदोरी बु, शनिवारी सकाळी ८ ते ११ भजन हनुमान वारकरी भजन मंडळ नंदोरी बु, सकाळी ८ वाजता पालखी सोहळा, ११ ते २.३० वाजता ह.भ.प. सुनिल येरखेडे महाराज नागपुर यांचे कीर्तन होणार आहे. यानंतर होणार्‍या पालखी सोहळ्यात नंदोरी परिसरातील विविध भजन मंडळे उपस्थित राहणार आहे. या तीन दिवशीय कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जगन्नाथबाबा देवस्थान कमेटी तथा समस्त ग्रामवासी नंदोरी च्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात