*खांबाडा येथे ‘स्मार्ट कॉटन’ अंतर्गत स्वछ कापूस वेचणी शेतकरी प्रशिक्षण

39

नेरी

.           स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत शेतकरी आणि प्रक्रिया उद्योग या दोघांसाठी स्मार्ट कॉटन उपप्रकल्प हा कापसाची मूल्यसाखळी अधिक कार्यक्षम सर्वसमावेशक आणि फायद्याची कार्यक्षम मूल्यसाखळी उभी करणे हे स्मार्ट कॉटन या उपप्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे या साठी तालुक्यातील 15 गावाची निवड करण्यात येते त्याकरिता खांबाडा या गावाची निवड करून येथील शेतकरी गटाचे स्वछ कापूस वेचणी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि 7 डिसें तालुका कृषी अधिकारी कार्यालय चिमूर च्या वतीने आयोजित करण्यात येऊन संपन्न करण्यात आले.

.           नेरी जवळील खांबाडा येथील स्वछ कापूस वेचणी कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून कृषी अधिकारी व्ही के शेंडे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आर एन कंनाके कृषी पर्यवेक्षक नेरी चे आर के निखारे कृषी सहायक टी व्ही येसंनकर मान्यवर म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी शेंडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की राज्यात उत्पादित कापूस हा एकजिनसी एकप्रत स्वछ नसल्या कारणाने कापसाची प्रत घसरते व कापसाला अपेक्षित भाव मिळत नाही कापूस उद्योगाला एकजिनसी एकसारखा व स्वछ कापूस मिळत नाही त्याकरिता आपल्या तालुक्यातील एक गाव एक वाण अशी निवड करून किमान शंभर शेतकरी याप्रमाणे कापसाची लागवड करावी जेणेकरून प्रक्रिया मुल्य साकळी तयार करता येईल त्याच प्रमाणे रुई आधारित बाजार व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग अजीबात राहणार नाही.

.            असे सांगितले यानंतर कन्नके यांनी कापूस उत्पादनावर शेतकऱ्यांना माहिती दिली यात त्यांनी कापूस उत्पादन हे स्वछ प्रतीचे पीक घेऊन शंभर कापूस गाडी तयार करण्यासाठी 550 विंटल कापूस शेतकरी गटाकडुन वर्षांला देण्यात यावे तसेच डा पंजाबराव देशमुख जैविक मिशन योजना अंतर्गत प्रति गट 50 हेक्टर चे करण्यात येऊन दहा गटाचे एक शेतकरी उत्पादक कंपनी तालुक्यातील जैविक गटाचे करावे कारण त्यामुळे विषमुक्त अन्न उत्पादन होणार हेच या योजनेचे महत्व आहे असे प्रतिपादन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर के निखारे यांनी केले तर संचालन व आभार टी व्ही येसनकर यांनी केले या वेळी खांबाडा व परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते