दत्ताजी डिडोळकर जयंती शताब्दीला तीव्र विरोध

30

सम्यक विद्यार्थी आंदोलन चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सिंदेवाही 

.         सर्व महाविद्यालये, आणि विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे संस्थापक दत्ताजी डीदोळकर यांची जयंती शताब्दी वर्ष साजरा करण्यासाठी यु.जी.सी. यांनी पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. याचा निषेध करून नुकतेच सम्यक विद्यार्थी आंदोलन यांचे वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तीव्र विरोध करण्यात आला.

.         राज्यात अनेक संघटना कार्यरत असताना विषमता वादी असलेली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेचे संस्थापक दत्ताजी डीडोळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी यू.जी.सी.कडून विद्यापीठ आणि सर्व महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत, याचा सम्यक विद्यार्थी आंदोलन वतीने महाराष्ट्र भरात जाहीर निषेध करण्यात येत आहे.दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्याच महाविद्यालयामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे संस्थापक यांचा जनशताब्दी साजरा करू देणार नाही असा इशारा चंद्रपूरचे उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी संजय .ग.पवार यांच्या मार्फत निवेदनाद्वारे देण्यात आला.

.         यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन चे मार्गदर्शक विद्यार्थी नेते धिरज तेलंग,जि. महासचिव प्रशांत गणविर, कोषाध्यक्ष प्रशिक खांडेकर, विल्सन कोवले, क्षितिज इंगळे, निकिता कांबळे,भिमराज बागेसर,सनी उराडे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते‌.