आदिवासींच्या न्याय हक्कासाठी पुढाकार घेणारा एकमेव पक्ष काँग्रेसच : विजय वडेट्टीवार

29

  चोरटी येथे आदिवासी सांस्कृतिक संमेलन तथा सल्ला गांगरा शक्तीपूजन 

ब्रह्मपुरी

.           राज्यात सध्या आरक्षणावरून वादळ पेटले आहे. अशातच वनवासी संबोधून आदिवासी समाजाची थट्टा केल्या जात आहे. आदिवासी समाज हा भूतलाचा खरा मालक असून मूळनिवासी आहे. आदिवासी समाजासाठी नेहमीच काँग्रेस पक्षाने विकासाच्या प्रवाहात आणणे करिता विविध कायदे केले असून आदिवासींच्या न्याय हक्कासाठी पुढाकार घेणारा एकमेव पक्ष काँग्रेसच असल्याचे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रह्मपुरी तालुक्यातील चोरटी येथे आयोजित आदिवासी सांस्कृतिक संमेलन तथा सल्ला गांगरा शक्ती पूजन या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते.

.           आयोजित कार्यक्रमास उद्घाटक म्हणून मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेश महामंत्री पोरलाल खरते, अध्यक्ष म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार, प्रमुख अतिथी म्हणून सहस्रम कोरोटे, महाराष्ट्र आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, काँग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ. नामदेव कीरसान, बिरसा क्रांती दलाचे अध्यक्ष दशरथ मडावी, महिला अध्यक्ष गिरीजा उईके, ग्रामपंचायत अड्याल सरपंच प्रतिमा गेडाम, गडचिरोली सेवा दल अध्यक्ष सावसाकडे, प्रीतेश येरमे ,काँग्रेस तालुकाध्यक्ष खेमराज तिडके, माझी जि प सदस्य राजेश कांबळे, कृउबा सभापती प्रभाकर शेलोकर, जगदीश आमले, योगिता आमले, बालाजी गाडे, सदाशिवराव कोल्हे, व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.

.           याप्रसंगी आदिवासी समाजाला हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम सरकार करीत असून आदिवासी समाजावर होणारे अन्याय यावर उपस्थित पोरलाल खरते व दशरथजी मिळावी यांनी प्रकाश टाकून आदिवासीं समाजाच्या समस्या व गरजा उपस्थितां पुढे मांडल्या. तर पुढे बोलताना विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार म्हणाले की, केंद्र व राज्यात बसणाऱ्यांकडून आदिवासी समाजाची थट्टा केली जात असून त्यांना वनवासी असे संबोधण्यात येत आहे. मात्र भूतलावरील प्रथम हक्क गाजवणारा आदिवासी समाज व त्यांची संस्कृती ही स्त्री पुरुष समानतेचा पाठ शिकविणारी असून आदिवासी समाज हा अतिशय कष्टाळू व मेहनती ने पुढें जाऊन आज प्रगती जरी केली असती तरी मात्र शासनाने आदिवासी समाजाचे आरक्षण कायम ठेवून त्यांना मुबलक सोयी सुविधा पुरविने गरजेचे आहे. तसेच आदिवासी समाजाला जमिनीचा मूळ मालक म्हणून संबोधणारे राहुल गांधी हे देशाचे पहिले नेते आहेत असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यानंतर आदिवासी समाज बांधव व भगिनींनी आदिवासी समाजाचे पारंपारिक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी प्रामुख्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील बहुसंख्येने आदिवासी समाज बांधव भगिनी युवक वर्ग तथा काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.