लिंगनडोह शाळेतील स्वयंपाक गृह निर्मितीच्या कार्याचे उदघाटन

43

    अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ कंपनीचे सामाजिक दायित्व   

गडचांदूर

.           अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सामाजिक दायित्वांच्या कार्या द्वारे जवळ पासच्या गावांतील मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देत लिंगनडोह येथे दि 02 डिसेम्बर रोजी शाळेतील स्वयंपाक गृह निर्मितीच्या कार्याचे उदघाटन करण्यात आले.

.           या उदघाटना प्रसंगी लिंगनडोह गावातील नागरिक आणि सी. एस. आर. टीम माणिकगढ यांची उपस्थिती होती. या कार्याला यशस्वी करण्याकरिता जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक लोंढे यांचे मार्गदर्शन व सहयोग मिळाला. या स्वयंपाक गृह निर्मिती मुळे शाळेतील व अंगणवाडील मुलांचे मध्यंतरी भोजन बनवण्यासाठी मदत होईल असे प्रतिपादन शिक्षक वर्ग व गावकऱ्यांनी केले. या कार्याला यशवी करण्याकरिता माणिकगढ सी. एस. आर. पथकाने अथक प्रयत्न केलेत.