टेमूर्डा येथे भव्य कबड्डी सामने 

42
माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचा हस्ते उद्घाटन  
टेमुर्डा
.          संकट मोचन क्रिडा मंडळ टेमुर्डा च्या वतीने भव्य कब्बडी सामन्याचे आयोजन करण्यात आले. या सामन्याचे उदघाटन  माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली न.प.वरोरा तथा जिल्हा सचिव भाजपा यांचा हस्ते करण्यात आले.
.          या प्रसंगी अहेतेशाम अली यांनी सर्व कबड्डी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. आयोजकांना अतिशय उत्कृष्ठ असे कबड्डी सामने आयोजीत केल्याबद्द्ल संकट मोचक क्रिड़ा मंडळ, टेमूर्डा च्या सर्व टिम चे अभिनंदन केले. या कार्यक्रमात वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे,  राऊंड ऑफिसर चांभारे  वनपरिक्षेत्र टेमुर्डा, सुरेंद्र देठे, राजु तिखट, विलास झिले – संचालक कृ.उ.बा.समिती वरोरा, डॉ. सरोदे, सोबतच टेमुर्डा येथील अनेक मान्यवर, क्रिडा प्रेमी आणी गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते