पिकांची पाहणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी पोहचले बांधावर

38

अवकाळी पावसाने पिके धोक्यात

चंद्रपुर

.          सलग तीन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने धान, कापूस पिके धोक्यात आली आहे. परिणामी शेतकर्‍यांना मोठा फटका बसणार आहे. याबाबत ची माहिती मिळताच गोंडपिपरी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी यांनी तोहोगाव येथील थेट शेतकर्‍यांच्या बांधावर पोहचून शेत पिकांची पाहणी करीत नुकसानी बाबत आढावा घेतला.

.          गोंडपिपरी तालुक्यातील २६ नोव्हेंबर पासून अवकाळी पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या शेतात उभे असलेले धान पीक व कापूस खराब होत असल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत गोंडपिपरी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी बालाजी शेवाडे यांना माहिती मिळताच त्यांनी थेट तोहोगाव येथील शेतकर्‍यांच्या बांधावर पोहचत धान, कापूस पिकांची पाहणी केली. यावेळी काही शेतकर्‍यांशी चर्चा करीत कर्मचार्‍यांना सर्वेक्षण करण्याच्या सुचना देण्यात आल्या.

.          यावेळी धाबा मंडळाचे मंडळ अधिकारी प्रशांत बैस, तलाठी सुवर्णा खार्डे, तोहोगाव चे पोलीस पाटील मोरे, ग्रामपंचायत तोहोगाव च्या सरपंच ताडे व शेतकरी उपस्थित होते.