ग्रामपंचायत देवापयली येथील घटना : मनमानी घरटॅक्स, पाणीपट्टी कर वाढविल्याचा नागरिकांचा आरोप पोलिसांच्या मध्यस्थीने सरपंच, सचिव व सदस्य सुखरूप बाहेर
नागभीड
. ग्रामसभेत कुठलाही विषय न ठेवता घरटॅक्स व पाणी पट्टी कर वाढविण्यात आला. तसेच 2023- 24 या चालू आर्थिक वर्षातील कर न भरणाऱ्या जनेतला नर्सरी संगोपनाच्या कामावर घेतले नाही. कामावरून वापस केले असा आरोप करत ग्रामस्थांनी सरपंचासहित सचिवाला तब्बल तीन तास कोंडल्याची घटना बुधवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत देवपायली येथे घडली. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने सरपंच, सचिव व सदस्य यांनी सुखरूप बाहेर काढले.
ग्रामपंचायत देवपायली येथे दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी तहकुब झालेली ग्रामसभा आज 29 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत देवपायली येथे 12 वाजता ठेवण्यात आली होती. सदर सभेला सरपंच अरविंद कोहपरे, सचिव प्रशांत दोडके, सदस्य अर्चना ठाकरे, इंदिरा नवघडे, मोरेश्वर नवघडे, वैशाली भोयर यांची उपस्थिती होती.
. देवपायली ग्रामपंचायत कार्यालयात विषय सुचीनुसार सभेला सुरवात करण्यात आली. मात्र गावातील काही लोक पोहचण्याआधीच कुठल्याही जनतेच्या विषयावर चर्चा न करता सभा संपविण्यात आली. तसेच मनमानी पद्धतीने हे सगळे विषय ग्रामसभेत न घेता परस्पर सभा ग्रामस्थ हजर नसताना संपवण्यात आल्याने ग्रामस्थांनी गोंधळ केला. व सरपंच, सचिव, ग्रामपंचायत सदस्य, शिपाई यांना ग्राम पंचायतीच्या आत कोंबून ठेवून ग्रामस्थांनी बाहेरून कुलूप लावून तब्बल तीन तास कोंडून ठेवण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी नागभीड पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. नागभीड पोलिसांनी ग्रामस्थ व सरपंच, सचिव, सदस्य यांच्या मध्ये योग्य सकारात्मक चर्चा करून सदर सरपंच,सचिव,व सदस्य यांना बाहेर काढले व ग्रामस्थांच्या मागणी नुसार 4 डिसेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे..!!
सरपंच्यांच्या परवानगीने संपवण्यात आली सदर ग्रामसभा ही ठरल्या नुसार सुरु करण्यात आली व सरपंच यांच्या परवानगीने संपवण्यात आली. पाणी पट्टी, व घरटॅक्स हे नियमानुसार वाढविण्यात आलेले आहेत. ग्रामस्थांच्या मागणी नुसार त्यांच्या विषयावर चर्चा करण्या साठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशांत दोडके, ग्रामसेवक ग्रामपंचायत देवपायली
ग्रामस्थ पोहोचण्याच्या आधीच ग्रामसभा आटोपली ग्रामस्थांना विचारत न घेता मनमानी पद्धतीने घरटॅक्स, पाणीपट्टी कर व इतर निर्णय घेण्यात आले तसेच ग्रामस्थ सभेला पोहचायच्या आधीच ग्रामसभा संपविण्यात आली त्यामुळे ग्रामस्था संतापले आणी सर्वांना ग्रामपंचायत मध्ये कोंडण्यात आले. वामन मडावी, ग्रामस्थ ग्रामपंचायत देवपायली