अवैध रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या

41

ट्रॅक्टर जप्त : नव्या तहसीलदाराची धडक कारवाई 

सिंदेवाही 

.          तहसील कार्यालय सिंदेवाही अंतर्गत सध्या सर्रास रेतीची तस्करी सुरू असून रेती तस्करांनी अनेक चोरटे मार्ग तयार करून रेतीची चोरी करणे सुरू केले आहे. असे असताना तालुक्यातील पेटगाव परीसरात काल रात्रीला अवैध रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करून सिंदेवाही तहसील कार्यालय येथे लावण्यात आले असल्याने परिसरातील गौण खनिजाची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

.          सिंदेवाही तालुका हा रेतीसाठी प्रसिद्ध असून या तालुक्यात मागील वर्षी आठ ते नऊ रेती घाट लिलाव करण्यात आले होते. असे असले तरी सिंदेवाही तालुक्यात अनेक रेती तस्कर तयार झाले असून मिळेल त्या रस्त्याने रेतीची चोरटी वाहतूक करण्यात पटाईत झाले आहेत. दरम्यान पेटगाव मार्गावर एक ट्रॅक्टर ने रेती तस्करी केल्या जात असल्याची गोपनीय माहिती नवनियुक्त सिंदेवाही तहसीलदार संदीप पानमंद यांना मिळाली. त्यामुळे तहसीलदार यांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर पाळत ठेवत अखेर काल रात्रो १ वाजताचे सुमारास गस्ती वर असतांना सिंदेवाही तालुक्यातील पेटगाव मार्गावर अवैध रेती ने भरलेला विना क्रमांकाचा व वाहनाचे लाईट न लावलेला ट्रॅक्टर पेटगाव गावातील मार्गावर सिंदेवाही तहसीलदार यांनी पकडला असुन ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जप्त केला आहे.

.          सदर कारवाई करण्यात आलेले ट्रॅक्टर हे पेटगाव येथील भोजराज चौधरी यांचे मालकीचे असल्याचे कळते. अवैध रेती तस्करी वाहतूक करणारे ट्रॅक्टर गौण खनिज कायद्या अंतर्गत प्रकरण उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्याकडे सदर ट्रॅक्टर वर दंडात्मक कारवाई करावी असा प्रस्ताव दाखल केल्याची माहिती सिंदेवाही तहसीलदार यांनी दिली आहे. तसेच सदर कारवाई नंतर तहसिलदार संदीप पानमंद यांनी अवैध गौण खनिजांची लूट करणाऱ्यांची गय केल्या जाणार नाही असे बोलून दाखविले. या कारवाईने मात्र तालुक्यातील अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.