डिआरएम स्पेशल ट्रेनच्या धडकेत वाघाचा मृत्यू

96

नागभीड

.          गोंदिया वरुन चांदाफोर्ट साठी निघालेल्या डीआरएम स्पेशल गाडी ने नागभिड – तळोधी रेल्वे मार्ग दरम्यान किटाडी मेंढा जवळ रविवारी रात्रौ ३ वा. च्या सुमारास पट्टेदार वाघाला धडक दिली यात वाघाचा जागीच मृत्यू झाला.

.          मिळालेल्या माहितीनुसार दपुम रेल्वे बिलासपूर झोन चे जनरल मॅनेजर यांचा १ डिसेंबर ला गोंदिया – चांदाफोर्ट रेल्वे मार्गाचा दौरा करणार असल्याने त्या संबंधित पुर्व तयारी चा आढावा घेण्यासाठी दपुम रेल्वे नागपूर डिव्हीजन मंडल प्रबंधक डीआरएम नमिता त्रिपाठी यांचा सोमवारी चांदाफोर्ट – नागभीड- गोंदिया रेल्वे मार्गाचा दौरा करणार होत्या.गोंदिया वरुन चांदाफोर्ट साठी निघालेल्या डीआरएम स्पेशल (SPIC) गाडी ने नागभिड – तळोधी रेल्वे मार्ग दरम्यान किटाडी मेंढा जवळ किलोमीटर ११४२/३-४ मध्ये रात्रौ ३ वा. चे सुमारास वाघाला धडक दिल्याने वाघाचा जागीच मृत्यू झाला.