अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

38

माजरी पोलीसांची कारवाई

माजरी

.         माजरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी शुक्रवारी रात्री गस्त घातली असताना गस्तीवर असलेले ठाणेदार अजितसिंग देवरे व पोलीस कर्मचाऱ्यांना देऊळवाडा – माजरी या मार्गावर महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर व विना क्रमांकाची ट्रालीने चोर मार्गाने अवैध रेती वाहतूक करताना मिळून आले.

.         यामध्ये टॅक्टर चालक गणेश सदाशिव कडाम रा. पाटाळा व मालक प्रकाश रमेशचंद्र खिलोशिया रा. मंजुषा ले -आऊट भद्रावती यांचा समावेश आहे. दरम्यान, शुक्रवारच्या मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास माजरी पोलीस गस्तीवर असताना रात्री रेती तस्करी होत असल्याची माहिती ठाणेदार देवरे यांना मिळाली. दरम्यान पोलिसांनी रेती चोरून नेत असताना देऊळवाडा – माजरी मार्गावर सदर टॅक्टर पकडले. आणि ट्रॅक्टर क्र.एम.एच. ३४ एल ६७८७ व विना क्रमांकाची ट्राली ताब्यात घेतले. तपासणी दरम्यान ट्रॅक्टर चालक व मालकाजवळ कोणताही रेती वाहतुकीचा परवाना नसल्याने ती रेती चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने ट्रॅक्टर मालक व चालकाविरुद्ध माजरी ठाण्यात अप क्र.११४/२३ कलम ३७९, ३४ भादवि सहकलम ३/१८१, ५० (२) /१७७ मोवाका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई ठाणेदार अजितसिंग देवरे, सफौ. रमेश तुराणकर, पोशि भाऊराव हेपट, पोशि प्रदिप गाडेकर यांनी केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास सफौ रमेश तुराणकर करित आहेत.