वासेरा ग्राम पंचायत चे वतीने संविधान दिन संपन्न

41

सिंदेवाही

.         देशातच नाही तर जगात ज्याचा गाजावाजा होतोय असे भारतीय संविधान असून २६ नोव्हेंबर रोजी ७४ व्या संविधान दिनाच्या औचित्य साधून ग्राम पंचायत कार्यालय वासेरा यांचे वतीने संविधानाची उद्धेशिका वाचन करून बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आले.

.         सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वासेरा येथे संविधान दिनानिमित्त सकाळीं ९ वाजता ग्राम पंचायत कार्यालय येथे संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत सरपंच महेश बोरकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून पुष्पमाला अर्पण केले. व उपस्थित सर्व मान्यवरांनी संविधानाच्या उद्धेशीका वाचन करण्यात आली. त्यानंतर गावातील श्रावस्ती बुद्ध विहार जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सरपंच महेश बोरकर, उपसरपंच मंदा मुनघाटे, सदस्य दिलीप मेश्राम, निखिल कोवे, सुरेखा चिंमलवार, अस्मिता रामटेके, माया सलामे, ग्राम विकास अधिकारी एच.एस. गुरूनुले, पोलीस पाटील देवेंद्र तलांडे, दिनकर बोरकर, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, तसेच गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.