१२ वी पर्यंत सर्व शाखेत मराठी विषय अनिवार्य करा : प्रा. सुनील डिसले

42
मराठी भाषेचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न
भद्रावती
.            महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, भंडाराद्वारा आयोजित मराठी विषयाचे सात दिवसीय प्रशिक्षण पार पडले. तज्ञ मार्गदर्शक मंडळी कडून व्याकरण घटकावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
मराठी भाषेच्या समृद्धीसाठी आणि संवर्धनासाठी, तसेच मराठी भाषेच्या अध्यापनातील समस्या दूर करण्याच्या हेतूने भंडारा जिल्ह्यातील, कनिष्ठ महाविद्यालयीन जवळपास १०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. दरम्यान विद्यार्थ्यांनी भाषिक कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. असा सूर मान्यवरांनी यावेळी काढला.
.            दिनांक १७ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर 2023 पर्यंत हे प्रशिक्षण ऑनलाईन आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणाचा समारोप दिनांक २३ नोव्हेंबर रोजी करण्यात आला. या ऑनलाइन प्रशिक्षणाचे संयोजन भंडारा जिल्हा प्रतिनिधी- प्रा. संजय लेनगुरे यांनी केले. नव्या तंत्रज्ञानाचा आणि तंत्राचा वापर करून मराठी भाषा ज्ञान, भाषा म्हणून प्रगल्भ करता येईल. तसेच भाषा शिक्षक, विद्यार्थ्यांना व्याकरणासोबतच कलाजीवनात भाषिक कौशल्य प्रदान करू शकतो. असा सूर या प्रशिक्षणातून उमटला. मराठी व्याकरणासारखा किचकट घटक अतिशय सोप्या पद्धतीने मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आला.
.            समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अशोक गव्हाणकर, महासचिव, विजुक्ता उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, मराठी विषय शिक्षक महासंघ हा मराठी भाषा विकासाला प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शनपर प्रशिक्षणाचे आयोजन करीत असते. त्यामुळे शासन दरबारी मराठी भाषेला प्राधान्य देण्यात यावे असे मत व्यक्त केले.
.            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. सुनील डिसले होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे. महाराष्ट्रात मराठी भाषा समृद्ध करण्याकरिता आम्ही अविरत प्रयत्न करीत आहोत. मराठी भाषा विषय किमान १२ वी पर्यंत अनिवार्य करण्यात यावा. या विषयाला विकल्प नको साठी लढा उभारलेला असून, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने याबाबत दखल घ्यावी. यापुढे मराठी भाषेवर आणि मराठी विषय शिक्षकांवर होणारा अन्याय सहन केल्या जाणार नाही, असे मार्गदर्शन केले.
.            यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून, कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे सचिव प्रा. बाळासाहेब माने, कार्याध्यक्ष प्रा. संपतराव गर्जे, विजुक्ट प्रांतीय सहसचिव प्रा. अभिजीत पोटले, प्रा. पवन कटरे, प्रा. अभिजीत डाखोरे, डॉ. प्रवीण चटप, प्रा. विजय कुत्तरमारे, डॉ. ज्ञानेश हटवार, प्रा. विजया मने, प्रा. उत्तमराव मेंढे, प्रा. युवराज खोब्रागडे, प्रा. प्रांजली दरवळकर प्रा. सोनाली बावनकर, प्रा. अंकुश तितीरमारे उपस्थित होते.
.            प्रमुख उपस्थिती तथा प्रशिक्षणाचे मार्गदर्शक म्हणून प्रा. हेमंत गव्हाणे, प्रा. दिलीप जाधव, प्रा. निता खोत, डॉ. शालिनी तेलरांधे उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन आणि प्रास्ताविक प्रा. संजय लेनगुरे यांनी केले. तर आभार प्रा. प्रियंका बोपचे यांनी मानले. यावेळी  जीया देसाई, वैशाली पटले, शालिनी डोंगरवार, आयुषी भुरे, अंजली गिरीपुंजे, अतुल चौधरी, दिव्या ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
.            कार्यक्रमाला बहुसंख्य शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, प्रा. मंदा बोंद्रे, प्रा. भारती माळवी, प्रा. काळे, प्रा प्रीती कांबळे, प्रा. वैशाली मेश्राम, प्रा. तितीरमारे, प्रा. उत्तम बनवाडे, प्रा. विनोद हटवार. प्रा. जितेंद्र टिचकुले, प्रा. निशिकांत ईश्वरकर, प्रा. पवन वंजारी, प्रा. नरेंद्र गायधने, प्रा. बावणे सर, प्रा. दानी सर, प्रा. ग्यानीराम धनगर, प्रा. सुखदेवे यांनी सहकार्य केले.