वरोरा तहसील कार्यालसमोर जिल्हाधिकार्‍यांच्या अधिसूचनेची होळी

37
तहसीलदारांमार्फत पालकमंत्र्यांना निवेदन 
वरोरा
.             यावर्षी हातात आलेले सोयाबीन चे पीक मोझ्याक नावाच्या रोगाने नष्ट केले. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. महसूल व कृषि विभागामार्फत मोका तपासणी करण्यात आली. जिल्हाधिकारी चंद्रपुर यांनी प्रधान मंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान या जोखीमेच्या अंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करण्याबाबत अधिसूचना काढली होती. मात्र शेतकर्‍यांना अजूनही पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. संतप्त शेतकर्‍यांनी वरोरा तहसील कार्यालयाच्या समोर जिल्हाधिकार्‍यांच्या अधिसूचनेची होळी केली.
.             या दरम्यान  सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी सकाळी ११ वाजता उपविभागीय कार्यालय वरोरा येथे पीक विमा धारक शेतकरी यांनी  दोन तास ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाची दखल कुणीही घेतली नाही म्हणून आम्हाला 100 टक्के पीक विमा मिळालाच पाहिजे, जय जवान जय किसान, पालकमंत्री मुर्दाबाद असे नारे देत  जिल्हाधिकारी यांनी ओरियंटल पीक विमा कंपनी ला दिलेल्या आदेशाची होळी करून तहसीलदार वरोरा  यांचे  मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपुर आणि जिल्हाचे पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात शंभर टक्के विमा शेतकर्‍यांना आठ दिवसात देण्यात यावा अन्यथा तोच आदेश जिल्हाधिकारी कार्यलय चंद्रपूर येथे होळी केली जाणार. आणि पालकमंत्री यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार. अशा इशारा यावेळी शेतकर्‍यांनी दिला.
.             यावेळी श्रीकृष्ण देवतळे, संदीप वासेकर, निखिल तिखट, केशव ताजने, प्रवीण बल्की, आकाश धवणे, नीलकंठ आमटे, आशिष डुकरे, मधुकर ढोके, अविनाश तुळणाकार, किशोर ठेंगणे, मोरेश्वर डुकरे तसेच शेकडो शेतकरी उपस्थित  होते. या आंदोलनाची सुरुवात तुकडोजी महाराज लिखित ग्रामगितेची पूजा करून करण्यात आली.
प्रशासकीय अधिकार्‍यांचा ग्रामगीता देऊन सत्कार                                                                                                                                                                                                                                                 प्रसाशानात सर्व सामान्य जनते सोबत आदराने वागणूक देणारे वरोरा तहसीलदार योगेश कौतकर तसेच पुलिस गुप्त हेर विभागात काम पाहणारे राजेश वऱ्हाडे यांचा गुरुदेव सेवा मंडळ आसाळा मार्फत गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मोरेश्वर डुकरे तसेच आंदोलनास सहभागी शेतकरी यांचा मार्फत ग्रामगिता देऊन सन्मान करण्यात आला.