बोथली येथे वीर बिरसा मुंडा जयंती उत्साहात

43

नेरी

.        नेरीवरून जवळ असलेल्या बोथली येथे वीर भगवान बिरसा मुंडा यांची जयंती दि 15 नोव्हे ला मोट्या उत्साहात साजरी करण्यात आली.

.        आद्य क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण गावातून त्यांच्या प्रतिमेची रॅली काढण्यात येऊन भगवान बिरसा मुंडा यांचा जयघोष करीत मिरवणूक मोठया धुमधडाक्याने वाजतगाजत काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांनी आदिवासी समाजाची पारंपरिक वेशभूषा करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आदिवासी नुत्य सादर करीत बिरसा मुंडा यांची मिरवणूक आकर्षन वाढवणारी ठरली यानंतर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

.        या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रभाकर सहारे सेवानिवृत्त प्राचार्य मार्गदर्शक म्हणून दडमल नेरी,प्रमुख पाहुणे म्हणून राजू डहारे सामाजीक कार्यकर्ते मनोहर चौधरी सरपंच बोथली प्यारेखा पठाण तानाजी चौखे, शेषराव दडमल पौर्णिमा चौधरी नमिता पाटील ग्रा प सदस्या मान्यवर म्हणून उपस्थित होते मान्यवरांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुहानी सहारे हिने केले तर संचालन प्रमोद चौधरी यांनी केले प्रसाद वितरनाणे कार्यक्रमाची सांगता झाली.