समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्या प्रा.नामदेव जाधव याच्यावर गुन्हा दाखल करा

33

  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भद्रावती पोलिसांत तक्रार 

भद्रावती

.           प्रा.नामदेव जाधव याने मराठा×कुणबी यात वाद निर्माण होइल आणि महाराष्ट्रातील वातावरण बिघडविण्याच्या दृष्टीने बेताल वक्तव्य एका व्हिडिओच्या माध्यमातून केलं, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते.खा.शरदचंद्र पवार यांच्या बद्दल खोटे-नाटे तथ्यहीन आरोप करून समाजात तेढ निर्माण करणे, .शरद पवार यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम त्यांच्या वक्तव्यातून केले.

.           त्यांच्या अश्या बेताल वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते आणि शरदचंद्र पवार यांचेवर नितांत श्रद्धा असणाऱ्या महाराष्ट्रातील असंख्य नागरिकांच्या भावना दुखावल्या, त्याबद्दल आज संपूर्ण महाराष्ट्रात अनेक पोलीस स्टेशन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रा. नामदेव जाधव यांच्या जाती धर्माच्या नावाखाली सोशल मीडियावर खोटी व बनावट माहिती प्रसारित करण्यामुळे तरुणांना दंगली घडविण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे त्यांच्यावर भा. द. वी. कलम ११७, १५३, १५३(अ), १५३(ब), २९५(अ), २९८, ४९९, ५००, ५०३, ५०४, ५०५(२) अन्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी मुनाज शेख प्रदेश सरचिटनिस तथा नागपुर शहर निरिक्षक,सुधाकर रोहनकर तालुका अध्यक्ष सुनिल महाले शहर, माजी शहर अध्यक्ष संजय आस्वले, ओबीसी प्रदेश पधअधिकारी राजेश मत्ते, महीला शहर अध्यक्ष सबिया देवगडे, प्रमोद वावरे, कुनाल मेंढे, निखिल जगताप व प्रमुख कार्यकर्ते ईत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ढानेदार ईंगळे यांनी लेखी तक्रार स्विकारून पुठील कार्यवाही करीता पाठवून योग्य ती कार्यवाही चे आश्वासन दिले.