शेगाव (खुर्द) परीसरात विज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराने जनता त्रस्त

104

  एका ट्रान्सफार्मर वरुन १९ कृषी पंपाना वीज पुरवठा शिवसेना उबाठा पक्षाचा आंदोलनात्मक पवित्रा  

वरोरा

.           तालुक्यातील शेगांव (खुर्द) परीसरात विज वितरण कंपनीच्या गलथान  कारभाराने  येथील सामान्य जनतेसह शेतकरी बांधव  त्रस्त असून  सदर कंपनीने आपल्या कारभारात सुधारणा करावी. अन्यथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे आणि तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांच्या मार्गदर्शनात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा युवा सेनेचे अभिजित कुडे यांनी दिला आहे. याप्रसंगी उत्तम ईखार, पंकज मांडवकर, रोशन भोयर, अजाब धानोरकर, बाळू टिपले, सुखदेव धानोरकर, दिवाकर मांडवकर, श्रावण चिडे व इतर शेतकरी उपस्थित होते.

.           अभिजित कुडे यांनी दिलेल्या माहिती नुसार असे कळते की, वरोरा तालुक्यातील शेगाव (खुर्द) परीसरातील एकाच  ट्रान्सफार्मर वरुन 19 कृषी पंपाना वीज पुरवठा केला जातो. या परीसरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होते. शॉर्ट सर्किट होणे तसेच विजपुरवठया संदर्भात इतर समस्या वारंवार निर्माण होत आहे. एक तास सुध्दा सुरळीत विज पुरवठा केल्या जात नाही. या समस्येसंदर्भात संबंधीत विभागाला वेळोवेळी निवेदने दिले. परंतु संबंधीत विभागाने कुठलीही दखल घेतली नाही. ही समस्या दोन वर्षापासून प्रलंबीत आहे. हे विशेष.

.           विज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराने विशेषतः शेतकरी बांधवांची डोकेदुखी वाढली आहे. पाणीपुरवठया अभावी शेतातील पिक करपत आहे. विहीरीत पाणी आहे. मोटार पंप आहे. परंतु विजपुरवठाच नियमित होत नसल्याने शेतातील  पिकांना योग्य प्रकारे पाणी पूरवठा करता येत नाही. यामुळे शेत पिकांची  मशागत आता कशी करायची ? असा प्रश्न या परीसरातील शेतकरी बांधवांसमोर निर्माण झाला आहे. अगोदरच नापिकीमुळे हैराण झालेला शेतकरी विजवितरण कंपनीच्या गलथान कारभाराने पुरा वैतागला आहे.

कारभार सुधारा अन्यथा  शिवसेना स्टाईलने आंदोलन करू : रविंद्र शिंदे यांचा इशारा                                                                                                                                                                                                          विज वितरण कंपनीने शेतकरी बांधव आणि सर्वसामान्य जनतेला चांगली सेवा द्यावी. शेगाव (खुर्द) परीसरातील शेतकरी बांधव व सामान्य जनतेच्या समस्या तात्काळ सोडवाव्या. अन्यथा शेतकरी बांधव आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी शिवसेना स्टाईलने आंदोलन करू. याप्रसंगी उद्भवणाऱ्या परीणामास केवळ संबधित विभागच जबाबदार राहील. असा इशारा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांनी दिला आहे.