खडसंगी शेतशिवारात दोन वाघांच्या झुंजीचा थरार

55

एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर : खडसंगी वनपरिक्षेत्रातील घटना

चिमुर

.            चिमुर वनपरिक्षेत्रामधील उपक्षेत्र खडसंगी नियतक्षेत्र खडसंगी येथील खडसंगी (बफर) क्षेत्राच्या सिमेवरील शेतात मौजा- वहानगाव शेत सर्व्हे क्रमांक 290 सुभाष दोडके यांच्या शेतजमीन मध्ये दोन वाघांची झुंज लागली यात वाघ (नर) वय अंदाजे 6 ते 7 वर्ष वाघाचा मृत्यु झाला तर दुसरा गंभीर जखमी असल्याची माहिती आहे सदर घटना मंगळवारी दिनांक 14 रोजी दुपारी 03 वाजताच्या दरम्यान निदर्शनास आलेली आहे.

.            खडसंगी प्रादेशिक वनविभागातील शेतशिवरात बरेच दिवसांपासून वाघाचा धुमाकूळ सुरु आहे. वहानगाव शेतशिवारात सात बैलासह एका गाईला या वाघांनी ठार केले आहे. तेव्हापासून वाघाचा नेहमीच या शेतशिवारात वावर सुरू होता. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चिमूर तालुक्याला लागून आहे. त्यामुळे बफर क्षेत्र असो किंवा प्रादेशिक वनविभाग असो वाघाचा वावर नित्याचा झालेला आहे. आज दुपारच्या सुमारास दोन वाघांची झुंज सुभाष दोडके यांच्याच शेतात झाली. ही झुंज इतकी भयंकर होती की, या झालेल्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या वाघाची स्थिती गंभीर दिसून येत होती. घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक वन विभागाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृत वाघाला खडसंगी वनविभागाच्या विश्रामगृहात उत्तरीय तपासणी पाठविण्यात आले

.            घटनेचे माहीती कळताच वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) के. बी. देऊरकर, चिमूर यांनी आपले अधिनिस्त वन कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी हजर झाले मृत वाघाची पाहणी केली असता त्याच्या गळ्यावर गंभीर स्वरुपाच्या जखमा आहे. उजवा व डाव्या पायावर जखमांचे मोठे मोठे घाव आहे. चेहन्यावर सुध्दा घाव दिसून येत आहे. पाठीवर घाव असून त्याचे मास निघालेले आहे. वाघाच्या मिशा, दात, सर्व नखे तसेच सर्व अवयक शाबुत आहेत. प्रथम दर्शनी सदर वाघ दोन वाघाच्या झुंजीमध्ये मरण पावला असावा. वाघाचे मोजमाप केले असता, नाकापासून ते धापर्यंत 213 से. मी., शेपटीची लांबी 90 से. मी. समोरच्या पायाची उंची खांद्यापासुन 113 से. मी. मागील पायाची उंची कमरेपासुन 118 से. मी. आहे.
घटनेचे वृत्त कळताच उपवनसंरक्षक दिपेश मल्होत्रा,, ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी. सुनिल हजारे, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदु), ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी श्री बंडु धोतरे, NTCA प्रतीनिधी तसेच अमोद गौरकर, NTCA चे प्रतिनिधी यांनी NTCA चे मार्गदर्शनात मोकापंचनामा नोंदविण्यात आला असुन पुढील कार्यवाही सुरु आहे.

 दोन वाघाच्या झुंजित एक मृत                                                                                                                                                                                                                                                                                  रक्तबंबाळकर एक मृत पावला, रक्तबंबाळ वाघाचे नाव मटका तर मरण पावल्या वाघाचे नाव बजरंग जर या दोन्ही वाघाची झुंज मुरलीधर दोडके यांच्या शेतात चालू असताना गावकऱ्यांनी थरार बघितला बजरंग या वाघाचे वय साडेसात ते सात वर्षे असून अंदाजे वजन सहा क्विंटल 50 किलो ते सात क्विंटल पर्यंत असावी असा अंदाज गावकरी,, दोन दिवसा अगोदर बजरंग या वाघाने तर गावातील शेतकऱ्यांचे बैल ठार केले होते. सुभाष दोडके यांच्या शेतात या झुंज चालू असताना त्या शेतात पेरलेल्या चण्याची बघणाऱ्या लोकांच्या पायदळी तुडवण्यात आला.