निर्वस्त्र मनोरुगणाला वस्त्र घालून देत त्याने जपली माणुसकी

38

खाकी वर्दीचा मनोरुग्णाला आधार

शेगाव पोलिसांची सामाजिक बांधिलकी

टेंमुर्डा

.         पोलिस म्हटले, की सर्वसामान्य जनता थोडी घाबरते. पोलिसांशी थोडे सुरक्षित अंतर राखूनच राहणे पसंत करते, पण वर्दी खाकी असली तरी ती ही माणसेच आहेत. त्यांनाही नातीगोती असतात. याचाच सुखद प्रत्यय आणून दिलाय तो शेगाव पोलिस ठाण्यातील ट्रॅफिक हवालदार नितीन कुरेकार यांनी.

.         वरोरा तालुक्यातील शेगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मनोरुग्ण महिला निर्वस्त्र अवस्थेत फिरत होती. हे सगळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना दिसत होते, पण काय करणार? वेळेच्या जाळ्यात व आपल्याला काय पडले, म्हणून रोडवर जाणाऱ्या व्यक्ती बघून कानाडोळा करीत होते. मात्र शेगाव पोलीस स्टेशन मध्ये नुकतेच रुजू झालेले ट्रॅफिक हवालदार नितीन कुरेकार यांचे त्या मनोरुग्ण कडे लक्ष गेले त्यांनी तात्काळ त्या मनोरुग्ण महिलेला कपडे घालून देत तीच शरीर झाकले, सोबतच तिच्या पायात जोडा चपल घालून देत समाजासमोर माणुसकीचे दर्शन घडविले.

घरच्यांनी ठोकरले, समाजाने बघितले, पोलिसांने झाकले                                                                                                                                                                                                                                          .         मनोरुग्ण म्हटलं की त्यांची वास त्यांची राहण्याची पद्धत ही वेगळीच असते त्यांना घरचे आणि समाज पण नाकारतात याच लोकांच्या मदतीला जो धावून जातो त्याला देव असे म्हटले जाते आणि नितीन कुरेकार हे देव रूपात उतरून त्या महिलेची अब्रू झाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला, घरच्यांनी ठोकरले समाजाने बघितले आणि आमच्या ट्रॅफिक हवालदाराने सर्व शरीर झाकून दिले.