सातव्या वेतनाच्या थकबाकीची मागणी
चिमूर
. ४८ वर्षापूर्वी स्थापना करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या सातव्या वेतणातील थकबाकीची रक्कम अजूनही मिळाली नाही त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचां सयंम सुटला आहे.
. या पार्शवभूमीवर राज्यभरातील कर्मचारी ६ नोव्हेंबर पासून काळी फित लावून निषेध नोंदवणार आहे आणि त्यानंतर १ डिसेंबर पासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना घेऊन अन्नत्याग आंदोलन करणार आहे.या सदर्भात महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी व कर्मचारी संघटनेने शासनाला निवेदन दिले आहे.
. एफडीसीएम महामंडळातील कर्मचाऱ्यांना २०२१ पासून सातवा वेतन लागू करण्यात आला.मात्र थकबाकी अजूनही मिळाली नाही.सातव्या वेतन आयोग थकबाकीसाठी मंत्रिमंडळाने २९ नोव्हेंबर २०२२ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांच्या अध्य्षतेखालील एक उपसमिती नेमली. वर्षभराचा कालावधी लोटत असतानाही या समितीची एकही झाली नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.किमान दिवाळीच्या दिवसात तरी थकबाकी द्यावी.अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
महाराष्ट्र राज्य वनविकास महमंडळात दोन हजारावर अधिकारी,कर्मचारी आहेत या माध्यमातून वनाचे जतन तसेच व्यावसायिक उपयोगातून शासनाला आर्थिक लाभसुद्धा करून दिला जात आहे.
” एफडीसीएम नफ्यात असूनही कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतनतील थकबाकी दिली नाही. या संदर्भात संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी निवेदन दिले आहे. मात्र त्याची कोणतीच दखल घेतली गेली नाही.आता प्रथम का फिती लावून लक्ष वेधण्यात येणार आहे. त्यानंतरही थकबाकी मिळाली नाही तर १ डिसेंबर पासून राज्यभरातील कर्मचारी, सेवानिवत्त कर्मचारी यांना घेऊन अन्नत्याग आंदोलन करणार आहे. रमेश बल्लया, सरचिटणीस, वनविकास महामंडळ अधिकारी कर्मचारी संघटना