लभानसराड पोथरा प्रकल्प लाल नाला प्रकल्पाचे पाणी कृषी सिंचनासाठी सोडा

71

 शिवसेना (उबाठा) चे उपविभागीय अभियंता यांना निवेदन 

 उपविभागीय अभियंता ने दिले पाणी सोडण्याचे आश्वासन   

चंद्रपूर

.          शिवसेना (उबाठा) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर यांनी आज दि. ६ नोव्हेंबर रोजी लभानसराड पोथरा  लाल नाला प्रकल्पाचे पाणी कृषी सिंचनासाठी सोडण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी संबंधीत प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता यांना निवेदन दिले. संबंधीत अधिकाऱ्याने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता. शिवसेना ( उ. बा. ठा. ) च्या वतीने मागणी केल्यानंतर सदर प्रकल्पाचे पाणी कृषी सिंचनासाठी तात्काळ सोडण्याचे आश्वासन  दिले.

.          वरोरा तालुक्यातील कोठा, कवडापूर, हिरापूर, कोसरसार, खांबाडा, बोडखा, फत्तापूर, बोपापूर, बारव्हा, आर्वी, वडगाव, मुरदगाव आणि तुमगाव ह्या शेत शिवारातील खरीप पिकांचे यापूर्वी  फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीन पिक मोझॅक या विषाणूने भुईसपाट झाले. धान पिकांचेही फार मोठे नुकसान झाले. इतर खरीप पिकांचे सुध्दा नुकसान झाले. या वर्षी पावसाळा लवकर संपल्यामुळे हृया शेत शिवारातील सध्या शेतीतील रब्बी पिके पाण्याअभावी वाळत आहे. शेतकऱ्यांचा रब्बी हंगामाचे पुन्हा एकदा नुकसान होऊ नये. यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून लभानसराड पोथरा लाल नाला प्रकल्पाचे पाणी कृषी सिंचनासाठी सोडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

.          शिवसेना ( उ. बा. ठा. ) तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांच्या नेतृत्वात लभानसराड पोथरा प्रकल्प लाल नाला प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता यांना आज दि. ६ नोव्हेंबर रोजी उपरोक्त मागणीचे निवेदन देतांना  विभागीय समन्वयक, खांबाडा-आबमक्ता जि.प.गट प्रमोद वाघ, अभिजीत कुडे, निखील मांडवकर, अजाब धोटे, गणेश बोरेकर, भारत कोकांडे, देविदास वैद्य, रवि बोरेकर, गणेश बोरेकर, विजय कुडे, रोशन भोयर, उत्तम इखार, सुखदेव धानोरकर, अजाब धानोरकर, शालिक मांडवकर, श्रावण चिडे, अनिल काटवले, संजय वागरे, सुधाकर वाढई, यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.