एस.टी. बसची दुचाकीला धडक : दुचाकीस्वार ठार

38
  • गडचांदूर – कोरपणा मार्गावरील घटना
  • विसापुरातील तरुण अपघातात ठार

चंद्रपूर

.         बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील एक तरुण दुचाकीने कोरपणा कडे जात होता.भरधाव वेगात येणाऱ्या राज परिवहन महामंडळाची बस येत होती.दुचाकीला एस.टी.बसची जबरदस्त धडक बसली.यात दुचाकी स्वार तरुण ठार झाला.ही घटना सोमवार दि. ६ नोव्हेंबर ला सायंकाळ ला ६.१५ वाजता दरम्यान गडचांदूर – कोरपना मार्गावर घडली. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव निखिल महादेव कोंडेकर वय २१ रा. विसापूर ता. बल्लारपूर जि.चंद्रपूर असे आहे. तो आई वडिलांचा एकुलता मुलगा होता.त्याच्या अपघाती मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

.         बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील निखिल कोंडेकर हा दुचाकी क्र.एम.एच.34 सी.एफ.7416 ने विसापूर वरून कोरपना कडे जात होता.गडचांदूर पार केल्यानंतर तो कोरपना कडे दुचाकीने जात असताना कोरपना कडून गडचांदूर कडे येणाऱ्या एस.टी.बस ची धडक बसली.यात निखिल हा रक्ताच्या थारोळ्यात काही वेळ पडून होता. याची माहिती गडचांदूर पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी त्याला गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डाक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

.         या घटनेची माहिती पोलिसांनी त्याच्या कुटुंबाला दिली.कुटूंबीयांनी गडचांदूर कडे धाव घेतली. निखिल हा महादेव व मालन कोंडेकर यांचा एकुलता मुलगा होता. त्याच्या अपघाती मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.