महाप्रबंधक इलियास हुसेन यांचा कोल मजदूर संघाकडून सत्कार

37

भद्रावती

.           वेकोली माजरी क्षेत्राचे महाप्रबंधक इलियास हुसैन यांना संपूर्ण कोल इंडियामध्ये 2023 या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट महाप्रबंधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल इंडियाच्या 49 व्या स्थापना दिनी 1 नोव्हेंबर रोजी कोल इंडियाच्या मुख्यालय कोलकाता येथे कोल इंडिया चे अध्यक्ष पी.एम. प्रसाद आणि कोळसा मंत्रालयाचे सचिव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात करण्यात आले.

.           स्वच्छता, पर्यावरण, यंत्रांची तांत्रिक देखभाल, अपघातमुक्त कोळसा उत्पादन आणि उद्दिष्ट महाप्रबंधक कार्यक्षमता अशा विविध बाबींच्या आधारे हा पुरस्कार घोषित केला जातो. याच अनुषंगाने भारतीय कोल मजदूर संघाच्यां वतीने माजरी क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक इलियास हुसेन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रांगदहाले, आवारी, महेश श्रीरंग, गजानन निमकर व इतर सदस्य उपस्थित होते. हा पुरस्कार मिळणे ही सर्व माजरी क्षेत्रासाठी व आमच्या साठी अतिशय अभिमानाची व आनंदाची बाब आहे. कोल इंडिया मधून वेकोलि माजरी परिसराचे महाव्यवस्थापक सर्वोत्कृष्ट महाव्यवस्थापक पुरस्कार मिळाल्याबद्दल वेकोलिचे अधिकारी, कामगार संघटना व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.