अखेर गावकर्‍यांनीच आवळल्या रेती तस्करांच्या मुसक्या

34

रेतीचा ट्रॅक्टर पकडून केला पोलिसांच्या स्वाधीन

नेरी

.            नेरीवरून जवळ असलेल्या सिरपुर नदीघाटावर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रेती तस्कर बिनधास्त रेतीची चोरी करत होते याबाबत गावकर्‍यांनी पोलिस व महसूल प्रशासनाला माहिती दिली मात्र कारवाई होत नसल्याने अखेर सिरपुर येथील गावकर्‍यांनी पुढाकार घेत रेती भरलेल्या ट्रॅक्टर ला पकडून पोलीस विभागाला पाचारण करून त्यांच्या स्वाधीन करीत रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या.

.            सिरपुर नदी घाटावर रोज रात्रीच्या अंधारात रेती तस्करी सुरू असते मात्र महसूल विभागाला याबद्दल माहिती नसल्याचे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केला जात आहे माहिती देऊनही महसूल विभाग दुर्लक्ष करीत आहेत अशी माहिती नागरिकांनी दिली आहे दि 1 नोव्हे रात्री 11 वाजता दरम्यान ट्रॅक्टर नदीत रेतीची तस्करी करण्यासाठी गेले असता सदर बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच गावकऱ्यांनी संगनमत करीत रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्याचा बेत करीत रस्त्यावर ट्रॅक्टर आडवा करीत तस्करांची नाकाबंदी केली असता अवैध रित्या रेती तस्करी करणार्‍या ट्रॅक्टर ला पकडले. मात्र त्या मागून येणारे दोन ट्रॅक्टर पळून जाण्यात यशस्वी झाले सदर माहिती महसूल विभागाला देण्यात आली तेव्हा त्यांनी तात्काळ पोलीस विभागाला कळवित चिमूर पोलिसांना पाठविले सदर ट्रॅक्टरला पोलीस स्टेशनमध्ये जमा करीत ट्रॅक्टर मालकावर खनिज मालमत्ता चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. असून पुढील कारवाई चिमूर पोलीस करीत आहेत. सदर ट्रॅक्टर वर पोलीस विभागाने गुन्हा दाखल करून जप्त केला असला तरी महसूल विभागाने सुद्धा कारवाई करून दंड वसूल करावा तसेच पुढील कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली असून महसूल प्रशासन काय कारवाई करते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.