- माजरीत विजयादशमी सण उत्साहात साजरा
माजरी
. माजरी येथे महागाई, भ्रष्टाचार, दहशतवादाच्या रूपातील एक मुखी 40 फूट उंच अशा विशाल पुतळ्याचे अनोख्या पद्धतीने दहन करण्यात आले. हा कार्यक्रम माजरी येथील वेकोलिच्या विजय स्टेडियमवर करण्यात आला. माजरी परिसरात प्रचंड गर्दी आणि कडेकोट बंदोबस्तात हा कार्यक्रम पार पडला. पंडित डॉ. मिश्रा यांच्या वैदिक मंत्रांच्या उच्चारात प्रमुख पाहुण्यांकडून अग्निबाण मारून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यानंतर एक एक करत तासनतास आकाशात वेगवेगळ्या रंगाच्या फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली.
. यापूर्वी माजरीत रावण दहन कार्यक्रम करण्यात येत होता मात्र आदिवासी समाजाच्या विरोधामुळे दोन वर्षापासून माजरी येथे महागाई, भ्रष्टाचार आणि दहशतवादाचे प्रतीक असलेल्या पुतळ्याचे दहन करण्यात येते. त्या पुतळ्याला दहातोंडे नसतात त्याला मिशी नसते ढाल नसते तलवार नसते मुकुट नसतो अशा अनोख्या पद्धतीने विजयादशमीच्या दिवशी पुतळ्याचे दहन करण्यात आले. कार्यक्रमात रामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.संपूर्ण मैदान जय श्री रामच्या जयघोषाने दुमदुमले होते. कार्यक्रमाच्या गंभीरतेला अनुसरून माजरी ठाणेदार अजितसिंग देवरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.माजरी व्यतिरिक्त परिसरातील पाटाळा, पळसगाव, नागलोण, कुचना येथील रहिवासी उपस्थित होते.
. भाजपा विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर, एम.पी.राव,हेन्सन राव, माजरीचे ठाणेदार अजितसिंग देवरे, खदान अधिकारी सिन्हा, नरेंद्र जीवतोडे, अहेतेशाम अली ,उपमहाव्यवस्थापक आरमुगम, डॉ.अंकुश आगलावे, माजरी सरपंच छाया जंगम, पत्रकार राजेश रेवते, चैतन्य कोहळे, विस्मय बहादे, अजय सिंग, अरुण सिंग, राकेश दोंतावार, विकास तिवारी आदी उपस्थित होते.
. आयोजक समितीचे अध्यक्ष हेन्सन राव म्हणाले की, रावण दहन हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. यामध्ये कोणत्याही समाजाच्या किंवा जातीच्या लोकांना दुखावण्याचा हेतू नाही.