बल्लारपुरात खासगी नोकरी भरती विरोधात जण आक्रोश

40

धरणे आंदोलनात विविध संघटनाचा सहभाग

उपविभागीय अधिकारी मार्फत शासनाला निवेदन

चंद्रपूर

.          राज्य सरकारने अलीकडे शासन निर्णयाच्या माध्यमातून तुघलकी निर्णय घेण्याचे धोरण अवलंबिले आहे.सरकारी नोकरीत खासगी यंत्रणेमार्फत भरती सुरु केली आहे. परिणामी शैक्षणिक अहर्ता धारक तरुणात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. राज्य सरकारच्या धोरणाविरोधात बल्लारपूर येथील नगरपालिका चौकात शुक्रवार ( दि. १४ ) रोजी दुपारी २ वाजता पासून धरणे आंदोलन करण्यात आले.या धरणे आंदोलनात तालुक्यातील विविध संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी स्नेहल रहाटे यांना निवेदन सादर करून सरकार विरोधात आक्रोश व्यक्त केला.

.          बल्लारपूर तालुका लोककल्याणकारी संघर्ष समितीच्या माध्यमातून राज्य सरकार विरोधात जण आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात विविध संघटनेच्या कार्यकर्त्यासह बेरोजगार युवक,विद्यार्थी,कंत्राटी कर्मचारी,सामाजिक व शैक्षणिक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी राज्य सरकारने जण विरोधी शासन निर्णय काढून जनतेची गळचेपी सुरु केली आहे. ते शासन निर्णय मागे घेण्याची आग्रही मागणी केली. कंत्राटी नोकर भरती निर्णय रद्द करण्यात यावा.सार्वजनिक शाळांचे होऊ घातलेले खासगीकरण करू नका.२0 विद्यार्थी असलेल्या शाळा बंद करू नका. जुनी पेन्शन योजना लागू करा.सुशिक्षित बेरोजगारांना ५ हजार रुपये महिना भत्ता द्या.राज्यात जातीनिहाय जणगनना करण्यात यावी. संवर्गनिहाय आरक्षण नोकर भरती करण्यात यावी ,आदी मागण्यांचे निवेदन बल्लारपूर येथील उपविभागीय अधिकारी स्नेहल रहाटे यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले.

.          यावेळी शिष्टमंडळात अनिल वागदरकर, बुद्यशील बहादे, रवी मेश्राम, रोहित जंगमवार, अमोल वर्मा, चंद्रकांत पावडे यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.